Priyanka Goswami, Common Wealth Games 2022, India,  Saam Tv
Sports

CWG22 : हिमा दासचं आव्हान संपुष्टात; प्रियांका गोस्वामीनं चालण्याच्या शर्यतीत पटकाविलं राैप्य

हिमा दासला दाेनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत अपयश आलं.

Siddharth Latkar

Common Wealth Games 2022 : बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये धावपटू हिमा दास (Hima Das) हिला दाेनशे मीटर धावणे क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीपासून दूर राहावे लागले. देशवासिय हिमाचे समाज माध्यमातून काैतुक करुन तिच्यावर पाठीवार थाप मारत तिला प्राेत्साहित करीत आहे. दरम्यान आज भारतीय (india) क्रीडाप्रेमींना प्रियाकां गाेस्वामीनं (Priyanka Goswami) चालण्याच्या स्पर्धेत राैप्यपदक पटकावून सुखद धक्का दिला आहे.

प्रियांकाने महिलांच्या दहा हजार मीटर चालण्याच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत (43:38.83) उज्जवल कामगिरी करीत द्वितीय स्थान पटकाविले. तिने मिळविलेल्या यशामुळे तिचे समाज माध्यमातून क्रीडाप्रेमीतून (Sports) काैतुक हाेऊ लागलं आहे.

दरम्यान दाेनशे मीटर धावणे क्रीडा प्रकारात हिमा दास (०.०१) सेकंदांच्या फरकाने मागे पडल्याने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींतून हळहळ व्यक्त हाेत हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

SCROLL FOR NEXT