CWG 2022 : भारतीय खेळाडूंवर अन्याय हाेताेय ? मुरली श्रीशंकरनंतर महिला हॉकी संघासमवेत काय घडलं पाहा

आता भारतीय संघाची लढत न्यूझीलंड बराेबर होईल.
Savita Puniya, Common Wealth Games 2022, India Vs Australia Hockey Semi Final Match
Savita Puniya, Common Wealth Games 2022, India Vs Australia Hockey Semi Final MatchSaam Tv
Published On

Hockey Common Wealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आयाेजकांच्या चुकीचा फटका भारतीय महिला हाॅकी (hockey) संघास बसला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात अखेरच्या क्षणी आयाेजकांनी माेठी चूक केली आणि भारतीय संघास पराभवास सामाेेरे जावे लागले. त्यामुळे भारतीय महिला संघास सुवर्ण, राैप्य पदकापासून वंचित राहावे लागले आहे. दरम्यान झालेल्या प्रकाराबाबत भारतीय संघाच्या प्रशिक्षक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (India Vs Australia Hockey Semi Final Match)

दूसरीकडे उंच उडीत मुरली श्रीशंकरच्या पहिल्या प्रयत्नांत त्याची उडी अवैध ठरविल्यानंतर हाॅकीत ही अन्याय झाल्याची भावना नेटीझन्ससह क्रीडाप्रेमी (Sports) हॅशटॅग चिटींग (Cheating) असे लिहून आयाेजकांवर राेष व्यक्त करु लागले आहेत. (Common Wealth Games 2022)

घड्याळ सुरुच नव्हते

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय बचावफळीने उत्तम खेळ केला पण संघाचे नशीब त्यांच्यासोबत नव्हते. प्रत्यक्षात पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅलोनचा फटका गोलरक्षक सविता पुनियाने आपल्या चपळाईने रोखून संघासाठी चांगली संधी निर्माण केली, परंतु यादरम्यान घड्याळ सुरू झाले नाही यामुळे पंचांनी ऑस्ट्रेलियाला दुसरी संधी दिली.

Savita Puniya, Common Wealth Games 2022, India Vs Australia Hockey Semi Final Match
CWG : पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरची सुवर्ण कामगिरी (व्हिडिओ पाहा)

टीम इंडियाचा काय दाेष ?

खरंतर यामध्ये टीम इंडियाचा कोणताही दोष नव्हता. घडयाळ सुरु आहे की नाही हे पाहणे आयोजक आणि हॉकी फेडरेशनची संपुर्णत: जबाबदारी हाेती. परंतु असे असतानाही हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने दिला गेला. दुसर्‍या वेळी मॅलोनने गाेल नाेंदविला. त्यामुळे त्यांच्या संघाचा विजय निश्चित झाला. भारतास हा सामना ( 0-3) असा गमवावा लागला. दरम्यान यामध्ये टीम इंडियाचा काय दाेष ? असे नेटीझन्स विचारु लागले आहेत.

Savita Puniya, Common Wealth Games 2022, India Vs Australia Hockey Semi Final Match
M Sreeshankar : चर्चा चर्चा ! मुरली श्रीशंकरच्या जिद्दीची चर्चा; लांब उडीत पटकाविलं राैप्य (व्हिडिओ पाहा)

सविता पुनियाच्या डाेळ्यात अश्रु

आता भारतीय संघाची लढत कांस्यपदकासाठी न्यूझीलंडबराेबर होईल. या पराभवामुळे सविता पुनिया (Savita Puniya) निराश झाली. कर्णधार सविता म्हणाली, 'या पराभवातून सावरण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. हा सामना आमच्यासाठी महत्वाचा हाेता. आम्ही खूप मेहनत केली पण आणि सविताच्या डाेळ्यातून अश्रु येऊ लागले. त्यातूनही तिने आता आमचे लक्ष कांस्य असल्याचे म्हटलं. कर्णधार आणि वरिष्ठ खेळाडू म्हणून माझी जबाबदारी आहे की मी खेळाडूंना प्रोत्साहित करणे. मला आता हा पराभव विसरून न्यूझीलंडविरुद्ध संघासाठी सर्वांची तयारी करुन घ्यायची आहे.

टीम इंडियाचे प्रशिक्षकही नाराज

पेनल्टी शूटआऊटमधील वादग्रस्त निर्णयामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक जीनेके शॉपमन यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. शूटआऊटच्या वादानंतर त्याचा खेळाडूंच्या मनोबलावर परिणाम होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. खरंतर या चुकीसाठी आयोजकांना जबाबदार धरलं पाहिजे. जेव्हा ही चूक समोर आली तेव्हा ऑस्ट्रेलियानेही त्याबद्दल तक्रार केली नव्हती. असाे. सगळे संधीचे वाट पाहत असतात. ही गोष्ट पंचांनाही समजू शकली नाही, कमाल आहे असेही शाॅपमन यांनी नमूद केले.

प्रशिक्षक पुढं म्हणाले कठीण आहे, मला वाटतं (1-0) ने आघाडी घेऊन वेगानं पुढे जाणं, आम्हांला शक्य हाेते. आमच्या पाच खेळाडू होते जे पुनरागमन करू शकत होते पण या घटनेनेही त्यांचे लक्ष विचलित झाले. हा प्रकार आमच्यासाठी दुर्देवीच म्हणावा लागेल.

असा झाला सामना

शेवटच्या क्षणी वंदना कटारियाने दमदार पुनरागमन केल्याने भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीत रोमहर्षक शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून (0-3) असा पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला रेबेका ग्रेनरच्या गोलवर ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली, पण त्यानंतर गोलरक्षक कर्णधार सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय बचावफळीने ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखले.

भारतीय संघासाठी वंदना कटारियाने (49 व्या मिनिटाला) सुशीलाच्या पासवर बरोबरीचा गोल केला. वादग्रस्त पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतासाठी नेहा, नवनीत कौर आणि लालरेमसियामी गोल करण्यात अपयशी ठरले. तर ऑस्ट्रेलियाच्या मॅलोन, लाफ्टन आणि कॅटलिन नॉब्स यांनी गाेल नाेंदवित संघाचा विजय सुकर केला. खरंतर पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले हाेते पण संघास एकही गोल नाेंदविला आला नाही. यानंतर भारतीय बचावफळीने जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर्सना एकही संधी दिली नाही.

Edited By : Siddharth Latkar

Savita Puniya, Common Wealth Games 2022, India Vs Australia Hockey Semi Final Match
Satara : किल्ले अजिंक्यता-याच्या दरीत ज्येष्ठ नागरिक पडला; शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम दाखल
Savita Puniya, Common Wealth Games 2022, India Vs Australia Hockey Semi Final Match
U-20 World Athletics C'ships : रुपल चौधरीनं पटकाविलं ब्राॅंझ; ऍथलिट हाेण्यासाठी वडिलांसमाेर बसली हाेती उपाेषणास

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com