Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujara Saam Tv
क्रीडा | IPL

Ranji Trophy : चेतेश्वर पुजाराने विक्रम करत वेधलं निवडकर्त्यांचं लक्ष; २० हजार धावा करत दिग्गजांना टाकलं मागे

Bharat Bhaskar Jadhav

Cheteshwar Pujara Record In Test Career :

भारत आणि इंग्लंड संघाच्या दरम्यान होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात कोणते खेळाडू असतील याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आलीय. परंतु यात चेतेश्वर पुजाराला स्थान देण्यात आलेले नाहीये. पुजारा वेटिंग लिस्ट असून तो त्याच्या खेळीने संघ निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेत आहे. चेतेश्वर पुजारा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सामने खेळत आहे. रणजी ट्रॉफीमधील पहिला सामना करत पुजाराने १५० धावा केल्या आहेत. (Latest News)

सध्या रणजी ट्रॉफीचे सामने होत आहेत. या देशांतर्गत सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) बाहेर असलेला चेतेश्वर पुजारा आपला दम दाखवत आहे. धमाकेदार शतकाने मोसमाची सुरुवात करत पुजाराने तिसऱ्या सामन्यात चांगली खेळी केली. विदर्भाविरुद्धात होणाऱ्या सामन्यात पुजाराने १५० धावा पूर्ण करत एक विक्रम केलाय.

पहिल्या डावात पुजाराने अर्धशतक पूर्ण करत बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने त्याची कसर पूर्ण केली. पुजाराने आपला 'ए वन' खेळ दाखवत कसोटी क्रिकेट (Cricket) करिअरमध्ये २० हजार धावा पूर्ण केल्या. २० हजार धावा पूर्ण करत पुजारा दिग्गज क्रिकेटपटूच्या यादीत पोहोचलाय.

ही किमया करणारा बनला चौथा क्रिकेटपटू

२० हजार धावा पूर्ण करणारा पुजारा हा चौथा भारतीय क्रिकेटपटू बनलाय. विदर्भाच्याविरुद्धात रणजी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात पुजाराने ६६ धावा केल्या. या धावांच्या मदतीने पुजाराने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एंट्री केली. ६६ धावांच्या मदतीने पुजाराच्या १९९०४ धावा झाल्या. त्यानंतर ९६ धावा करत पुजाराने २० धावा पूर्ण केल्या.

प्रथम श्रेणीत प्रवेश करणारे भारतीय क्रिकेटपटू

भारताकडून प्रथम श्रेणीतील सर्वाधिक धावांची नोंद महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. सुनिल गावस्कर यांनी २५,८३४ धावा केल्या. तर सचिन तेंडुलकरने २५३९६ धावा करत दुसरे स्थान पटकावले आहे. तिसऱ्यास्थानी भारताचा माजी कर्णधार आणि आताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. राहुल द्रविडने २३७९४ धावा केल्या आहेत.

आता या यादीत चेतेश्वर पुजाराने प्रवेश केला असून तो चौथ्यास्थानी विराजमान झालाय. पुजाराने माजी कसोटी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकलं आहे. लक्ष्मणने १९७७० धावा केल्या आहेत तर वसीम जाफरने १९४१० धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: डायबिटीजच्या रुग्णांनी अशापद्धतीने खावा भात, नाही वाढणार शुगर लेव्हल

Kangana Ranaut : ५ कोटींचे दागिने अन् महागड्या अलिशान कार; संपत्ती वाचून डोळे फिरतील

Skincare Tips: चमकदार त्वचेसाठी 'हे' टिप्स करा फॉलो

Today's Marathi News Live : माझ्यासोबत जे झालं ते खूप वाईट होतं; स्वाती मालीवाल यांनी दिली पोलिसांना त्या घटनेविषयी माहिती

Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT