Today's Marathi News Live : ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (16 may 2024): देश-विदेश, लोकसभा निवडणूक, राज्यातील प्रत्येक घडामोडी, राजकीय घडामोडी लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
16 May 2024 Latest Updates  PM Narendra Modi and sharad pawar
16 May 2024 Latest Updates PM Narendra Modi and sharad pawarSaam TV

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

कपिल सिब्बल यांनी ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांचा केला पराभव

आज झालेल्या निवडणुकीत सिब्बल यांना 1066 मते मिळाली तर प्रदीप राय यांना 689 मते मिळाली

सिब्बल यांनी तब्बल दोन दशकांनंतर बार असोशिएशनची निवडणूक लढवली होती

यापूर्वी सिब्बल 1995, 1997 आणि 2001 मध्ये SCBA चे अध्यक्ष होते

माझ्यासोबत जे झालं ते खूप वाईट होतं; स्वाती मालीवाल यांनी दिली पोलिसांना त्या घटनेविषयी माहिती

आप खासदार स्वाती मालीवाल यांचं ट्विट

माझ्यासोबत जे झालं ते खूप वाईट होत

माझ्याबाबत जे घडल त्याची पोलिसांना माहिती दिली

या कठीण काळात माझ्या सोबत राहिलेल्या सर्वांचे आभार

भाजपच्या नेत्यांना खास विनंती आहे या प्रकरणाच राजकारण करू नका - स्वाती मालीवाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला मुंबई पोलिसांनी उदयपूरमधून केली अटक

घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत १६ जणांनी जीव गमावलेला आहे. या अधिकृत होर्डिंग प्रकरणी भावेश भिंडेला मुंबई पोलिसांनी उदयपूरमधून केली अटक आहे. दोन दिवसांपासून पोलीस पथकं त्याच्या शोधात होती.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा

साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने संध्याकाळच्या सुमारास लावली जोरदार हजेरी

या अवकाळी पावसामुळे घरावरील बहुतांश ठिकाणचे छप्पर पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडे देखील पडली उन्मळून

वाऱ्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे घरापासून कित्येक अंतरावर पत्रे गेले उडून

जवळपास तासभर चाललेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत

काही ठिकाणी घरांची देखील झाली पडझड

साक्री तालुक्यातील वार्सा, कुडाशी, पोबारे, जेबापुर, सामोडे, चिकसे, देशशिरवाडे, धोंगडे दिगर, बल्हाणे या गावांसह परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

अंधेरी बार कौन्सिल संघटनेचा उज्वल निकम यांना पाठिंबा

उज्वल निकम हे भाजपा महायुतीचे उमेदवार

उज्वल निकम मुंबईमध्ये लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार

अंधेरी बार कौन्सिल संघटनेकडून एडवोकेट उज्वल निकम यांना पाठिंबा

आज अंधेरी न्यायालयात बैठक घेऊन दिला पाठिंबा

यावेळी अंधेरी कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी, सेक्रेटरी सुजय नंम्हे नवनिर्वाचित अध्यक्ष काशिनाथ त्रिपाठी आणि प्रियांका राणे उपस्थित

स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे PA विभव कुमार यांच्या विरोधात दिली तक्रार

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेली मारहाण प्रकरण

आप खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे PA विभव कुमार यांच्या विरोधात दिली तक्रार

दिल्ली पोलिस सूत्रांची माहिती

आज दुपारी पोलिसांचं पथक स्वाती मालीवाल यांच्या निवासस्थानी गेलं होत

उद्या विभव कुमार यांना चौकशीला हजर राहण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावल आहे

नांदेडच्या मुदखेड तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपलं

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मुदखेड तालुक्याला झोडपले.जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण कायम होते.या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

मराठा क्रांती मोर्चाचा मविआच्या उमेदवाराला पाठिंबा

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

भूषण पाटील हे महाविकास आघाडीचे तर मुंबई मतदार संघाचे उमेदवार

मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांनी भूषण पाटील यांना पाठिंबाचे पत्र दिले

कांदिवली बोरिवली मालाड दहिसर भागातील मराठा क्रांती मोर्चा चा भूषण पाटील यांना पाठिंबा

भूषण पाटील हे महाविकास आघाडीचे उत्तर मुंबई मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार आहेत

कृपया घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना द्या, भाजपच्या महिला अध्यक्षांचं स्वाती मालीवाल यांना पत्र

दिल्ली भाजप महिला अध्यक्षा ऋचा पांडे मिश्रा यांचं आप खासदार स्वाती मालीवाल यांना पत्र

आम्ही तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना द्या जेणेकरून आरोपींवर कठोर कारवाई करता येईल

अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी न्यायालयीन प्रक्रिया अनिवार्य आहे

आपली विचारधारा वेगळी असेल मात्र एक महिला म्हणून मी आपल्या सोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अल्पवयीन मुलीचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत , ग्रामस्थांचं मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल येथील 8 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची घटना काल उघडीस आल्यानंतर अजंग-वडेल येथील ग्रामस्थानी रास्ता रोको आंदोलन केले तर आज संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येऊन पुन्हा मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला होता.

नागपूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

नागपूरच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी

वादळी वाऱ्या सह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस

सकाळ पासून कडाक्याच्या उन्हामुळे वाढला होता मोठ्या प्रमाणात उकाडा

दिवसभर घामाच्या धाराने त्रस्त नागपूरकरांना उकाड्या पासून मिळाला काहीसा दिलासा

मात्र या अवकाळी पावसाने नंतर आणखी उकाडा वाढण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, सुनील तटकरेच्या कार्यकर्त्यांना सूचना

- देशाची महत्वाची निवडणूक असल्याने बैठक घेतली

- महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वाची चर्चा

- उमेदवार उशिरा जाहीर झाल्याने कार्यकर्त्यामध्ये शिथिलता आली होती

- अखेरच्या टप्प्यात कार्यकर्त्यांनी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याच्या सूचना

- 4 महिन्यांवर विधानसभा निवडणुकांच्याबाबत देखील तयारी करण्याचे आदेश

वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरातील पूजेवरून पुन्हा वाद, महेश महाराज यांना मारहाण

वाशिमच्या शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरात असलेल्या भगवान क्षेत्रपाल मूर्ती पूजन वरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यामध्ये श्वेतम्बर पंथीयां कडून मंदिरात ठेवण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकानी आणि श्वेतम्बर जैन यांच्या काही लोकांनी पुन्हा एक वेळा महेश महाराज यांना मारहाण करण्यात आली..

शिवाजी पार्कवर उद्या नरेंद्र मोदींची सभा, राज ठाकरेही असणार उपस्थित

लोकसभा निवडणुकचीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. मुंबई आणि नाशिक पट्ट्यातील जवळपास १३ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. नरेंद्र मोदींचीही उद्या शिवाजी पार्कवर सभा होणार असून या सभेला राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

कोडेंश्वर येथील वीटभट्टीवरील कारवाईनंतर मविआ आक्रमक 

अमरावती शहरातील कोडेंश्वर येथे वीट भट्टीवर अचानक महसूल विभागाने कारवाई करत वीटभट्टी उदध्वस्त केल्या होत्या तर आज काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मविआच्या नेत्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांची भेट घेत अतिक्रमण धारक वीटभट्टीवर तूर्तास कारवाई करू नका अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

लोकसभेतील उमेदवारांना पाठिंबा देण्यावरून मराठा क्रांती मोर्चामध्ये दोन गट

मराठा समाजाचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यावरून दोन गट

पाठिंबा देताना मनोज जरांगे पाटील यांना विचारून दिला का?

वंचितचे उमेदवार तथा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांचा सवाल

जे कधी मराठा आंदोलनात आलेच नाही त्यांचा मराठा मोर्चाशी काय संबंध

मराठा आरक्षणाचे सर्व मुद्दे मी हमी पत्राच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना देणार

सकाळी मराठा क्रांती मोर्चाचा काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला जाहीर केला होता पाठिंबा

प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या वडिलांच्या कारवर अज्ञातांचा हल्ला

अमरावती लोकसभा मतदार संघातील प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांचा मध्यरात्री हल्ला..

उभ्या असलेल्या गाडीवर हल्ला करताना हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद.

दिनेश बूब यांची सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार..

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकाचं नुकसान होण्याची शक्यता

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह वादळीवाऱ्याच्या पावसाला सुरुवात झालीय. तालुक्यातील ममदापूर, जामगाव अगर कन्नड गाव या शिवारात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामध्ये उन्हाळी बाजरी आणि आंबा या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

रायगडमधील माणगावला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने माणगावला झोडपले

रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठे नुकसन

इमारतींवरील पत्र्याच्या छप्परांचे नुकसान

पावसा आधी सुटला जोरदारा वादळी वारा

नागरीकांमध्ये घबराट

कामा निमित्ताने घरा बाहेर आसलेल्या नागरिकांचे मोठे हाल

अखेर आरटीई प्रवेश प्रक्रियेला मिळाला मुहूर्त, नियम बदलाला उच्च न्यायालयाने दिली होती स्थगिती 

राज्य शासनाने आरटीईमध्ये सुधारणांच्या नावे केलेल्या नियम बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या आठवडाभरानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लागला आहे.

या प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार असून,पालकांना उद्यापासून आपल्या पाल्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत.मात्र,यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज नव्याने भरावा लागणार आहे.

पुण्यात कंटेनर दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

पुण्यात कात्रज बायपासकडून देहूरोडला जाताना सकाळी नऊच्या सुमारास बाराचाकी कंटेनर व दुचाकीचा अपघात. संतोष दिलीप तिखट ( रा. सोलापूर ) हे कंटेनरखाली सापडले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक पोलीसाच्या मदतीने हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

नवी मुंबईत दोन खासगी बस जळून खाक

नवी मुंबईतील रबाळे येथील साईनगर झोपडपट्टीमधील वर्कशॉपमध्ये असणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या दोन बसला अचानक आग

अचानक लागलेल्या आगीत एक महिला अडकली होती. या महिलेला बाहेर काढण्यास यश

या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

Mumbai Car Fire : मुंबईत धावत्या कारला अचानक आग

मुंबईच्या खार पश्चिमेकडील खार सबवे परिसरात धावत्या कारला आग

या घटनेत आगीत कार जळून खाक

आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने कारमधून उडी घेतली.

त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही,

या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Rain In Satara :  साताऱ्यातील पाटण तालुक्यात वादळी पाऊस

साताऱ्यातील पाटण तालुक्यात वादळी पाऊस सुरु आहे.

उकड्याने हैराण झालेल्या पाटणवासियांना पावसाने दिलासा दिला आहे.

पावसामुळे भुईमूग काढणी ठप्प झाली आहे.

पाटण शहरातील जनजीवन विस्कळीत

आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता  

आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाला देखील दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आरोपी केलं जाईल, आप, केजरीवाल यांच्यासह इतरांवर देखील लवकरच चार्जशीट दाखल करू. आमच्याकडे केजरीवाल आणि आप विरोधात ठोस पुरावे आहेत, अशी माहिती ED च्या वतीने एडिशनल सॉलिसीटर जनरल S V राजू यांनी कोर्टात दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख आणि पक्ष सचिवाविरोधात गुन्हा दाखल  

शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख आणि पक्ष सचिवाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई दक्षिण मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये मु्ख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने

- मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधील रोड शोदरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले.

- मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रथासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली.

- 50 खोके एकदम ओकेची ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.

- मुख्यमंत्र्यांनी धनुष्यबाणाचा इशारा देत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना प्रत्युत्तर दिलं.

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजीची सभा रद्द, भीषण दुष्काळामुळे निर्णय

मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजीची सभा रद्द झाली आहे. भीषण दुष्काळ पाहता सभा रद्द करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने सभा रद्द केली आहे. पुढील बैठकीत सभेची तारीख निश्चित होणार आहे. बीडमधील मराठा समन्वयक तथा आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

Mihir Kotecha: धार्मिक कार्यक्रमात मिहिर कोटेचा यांना मतदान करण्याचं आवाहन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल  

धार्मिक कार्यक्रमात भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांना मतदान करण्याचं आवाहन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आयोजक सुनिल पाल यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड शो

नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येणार आहेत. हेमंत गोडसे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री यांचा नाशिकमध्ये रोड शो होणार आहे.

चंद्रबाबू नायडू कोल्हापूर आणि शिर्डीच्या दौऱ्यावर

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज कोल्हापुर आणि शिर्डी दौऱ्यावर आहेत.

सकाळी सव्वा अकरा वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे.

त्यानंतर आई अंबाबाईचे दर्शन घेऊन नायडू शिर्डीला रवाना होणार आहेत.

आई अंबाबाई आणि शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन नायडू पुन्हा आंध्रप्रदेशला परतणार आहे.

Mumbai rain Update : आज मुंबईत वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता

आज देखील मुंबईत वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत.

हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे.

सोमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मुंबईत हाहाकार माजवला होता.

Nashik News : नाशिक परिसरात ७ ते ८ दुचाकी तिघांनी पेटवल्या

- जुने नाशिक परिसरात उभ्या असलेल्या 7 ते 8 दुचाकी पेटून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

- दुचाकीवर आले तिघांनी तोंड बांधून जुन्या नाशिक परिसरात गाड्या जाळल्या आहेत.

- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गाड्यांची जाळपोळ घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

- भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- गाड्या जाळपोळची घटना cctv मध्ये कैद झाली आहे .

भाजप आणि आरएसएसचा आरक्षण संपवणं हा अजेंडा - अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल संयुक्त पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

भाजपला 400 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत, कारण त्यांना आरक्षण काढायच आहे.

भाजप आणि आरएसएसचा आरक्षण संपवणे हा अजेंडा आहे

देशातील अनेक राज्यात भाजपच्या जागा कमी होत आहेत.

rajapur news : राजापूरमध्ये बिबट्याचं पिल्लू मृतावस्थेत

राजापूर तालुक्यात बिबट्याचं पिल्लू मृतावस्थेत आढळून आलं आहे.. राजापुरातील जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणच्या रस्त्यालगत बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आलं. मृत बिबट्या बछडा हा मादी आहे. त्याचे वय साधारण तीन महिने असल्याचं वनविभागाने सांगितलं. त्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Raigad News : आपटा रेल्वे स्टेशन धावत्या कारला आग

रायगडमध्ये रस्त्यात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. खारपाडा ते रसायनी मार्गावरील घटना धावत्या कारला आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

Sanjay Raut : एक माणसाच्या प्रचारासाठी अनेकांची गैरसोय; संजय राऊतांची PM मोदींवर टीका

संजय राऊत काय म्हणाले?

एका माणसाचा प्रचार सुरळीत व्हावा, लोकांची गैरसोय करणारा प्रचार

मोठा होर्डिंग पडून ज्या ठिकाणी सतरा लोकांचा जीव गेला.त्याच ठिकाणी प्रधानमंत्री रोड शो करतात, हे अमानुष आहे.

4 जून नंतर देशात भाजपाचे अस्तित्व राहणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.

Nanded News : नांदेडमध्ये भंडाऱ्याच्या आंबलीतून 55 जणांना झाली विषबाधा

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील लालवंडी गावात विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

महादेवाच्या भंडाऱ्यातून हा सर्व प्रकार घडला आहे.

भंडाऱ्यातील जेवणानंतर अनेकांना बुधवारी मध्यरात्री उलटी, मळमळी चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला.

55 जणांना तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Hording Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : आता ढिगाऱ्याखाली कोणीही नसल्याचा पालिकेचा खुलासा

बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली.

ढिगाऱ्याखाली आता कोणीही अडकलं नसल्याचा पालिकेने खुलासा केला आहे.

आता केवळ मलाबा हटवण्याच काम सूरू आहे. यात १६ जणांचा दुर्घटनेत मृत्यू तर ७५ जखमी अशा माहिती समोर

Nashik News : PM मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा शरद पवार गटाचा कार्यकर्ता

- पिंपळगावमध्ये नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे.

- किरण सानप अस गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे.

- किरण सानप हे शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे.

- किरण सानप शेतकरी चळवळीत गेली अनेक वर्ष काम करत आहे.

Ghatkopar Hording Incident : होर्डिंग दुर्घटना : मुंबई महापालिका आयुक्त गगराणी घटनास्थळी

मुंबई महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी घाटकोपर दुर्घटनेस्थळी पोहोचले आहेत.

होर्डिंद दुर्घटनेच्या तीन दिवसानंतर बचावकार्य सुरु आहे.

Pune News : पुण्यातील धोकादायक होर्डिंग काढून टाका, महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

पुणे शहरातील धोकादायक होर्डिंग सात दिवसात काढून टाका, असे आदेश पुणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांनी दिले आहेत. जे कारवाई करणार नाहीत, त्यांना परिणाम भोगावे लागतील आयुक्तांचा सज्जड दम दिला आहे. पुण्यातही अधिकृत २ हजार ५९८ होर्डिंग आहेत. पण त्यात अनेक नियमबाह्य होर्डिंग असले तरी प्रशासनाकडून त्याला अभय दिले जात आहे

Nagpur News : मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर नागपूर महापालिका अलर्ट

मुंबईतील होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर नागपूर महानगरपालिका कामाला लागली आहे.

नागपूर महानगर अवैध होर्डिंग्जचा सर्व्हे सुरु आहे.

मनपाची परवानगी घेऊन लागलेले १०५३ होर्डिंग्ज, त्यासोबतंच रेल्वेच्या होर्डिग्जचंही स्ट्रक्चरल ॲाडिट होणार आहे.

नागपूर मनपाकडून सर्वेक्षणासाठी दोन टीम गठीत, आजपासून सर्व्हे सुरु आहे.

होर्डिंग्ज धोकादायक आहे की नाही, याची पाहणी करुन धोकादायक असलेल्या होर्डिंग्जवर कारवाई होणार आहे.

तर फिटनेस प्रमाणपत्र देणाऱ्या एजन्सीवर कारवाई होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com