Virat Kohli Saam Tv
Sports

Sports News: Ganguly vs Virat यांच्यातील Captaincy वादात नेमकं काय घडलं? चेतन शर्मांनी केला मोठा गौप्यस्फोट

चेतन शर्मा यांनी विराट आणि गांगुली यांच्यातील वादाबद्दल देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Saam TV News

Chetan Sharma sting Operation: सौरव गांगुली आणि विराट कोहली हे भारतीय संघातील दिग्गज फलंदाज आणि कर्णधार आहेत. विराटने परदेशात जाऊन भारतीय संघाला अनेक महत्वाच्या मालिकांमध्ये विजय मिळवून दिला.

तर सौरव गांगुलीने भारतीय संघाला एमएस धोनी सारखा हिरा शोधून दिला. दोघेही आक्रमक आहेत, उत्तम कर्णधार आहेत. त्यामुळे असे वाटले होते की, दोघेही जेव्हा एकत्र येतील तेव्हा दोघांची चांगली जमेल.

मात्र विराट कोहली भारताचा कर्णधार असताना जेव्हा सौरव गांगुलींची बीसीसीआयमध्ये एंट्री झाली तेव्हा असे काहीच पाहायला मिळाले नाही.

विराट विरुद्ध गांगुली हा सामना २०२१ च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये चांगलाच रंगला. सप्टेंबर महिन्यात विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याचे वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते.

विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुली यांनी म्हटले होते की, आम्ही विराटला कर्णधारपद सोडण्याबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र ही बाब जेव्हा विराटला विचारण्यात आली त्यावेळी त्याने स्पष्ट नकार देत, 'मला कोणीही विचार करण्याचा सल्ला दिला नव्हता'असे म्हटले होते.

विराटच्या या वक्तव्यानंतर सौरव गांगुली यांनी खोटे वक्तव्य केले आहे असे म्हटले जात होते. नेमकं खरं काय? याचा खुलासा आता चेतन शर्मा यांनी केला आहे. झी न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी विराट आणि गांगुली यांच्यातील वादाबद्दल देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.

चेतन शर्मांच्या मते, विराट कोहली खोटं बोलतोय. चेतन शर्मा यांनी म्हटले की, 'विराटला वाटत असेल की, त्याचं कर्णधारपद हे सौरव गांगुलीमुळे गेलं, मात्र असं काहीच नाहीये. निवड समितीची बैठक सुरु असताना व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगमध्ये एकूण ९ लोकं होती. ज्यामध्ये निवडकर्ते आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांचा समावेश होता. सौरव गांगुलीने विराटला म्हटलं असावं की, तू पुन्हा एकदा विचार कर. मात्र विराटला ते ऐकू गेलं नसावं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT