IND vs AUS : दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचं टेन्शन आणखीच वाढणार!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरूण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे.
IND vs AUS
IND vs AUSSaam tv

IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरूण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याला १७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. अशातच टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.  (Latest Marathi News)

IND vs AUS
Suryakumar Yadav:'सूर्यकुमार यादव टेस्टमध्ये हिट होऊ शकत नाही..'पाकच्या माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान

गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला टीम इंडियाच्या मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर फिट झाला आहे. बीसीसीआयने ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. दिल्ली कसोटीसाठी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) उपलब्ध झाल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.

श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबसाठी होता. आता बीसीसीआयच्या मेडिकल टीमने श्रेयस फिट असल्याचे सांगितले असून तो आता दिल्लीत भारतीय संघात (Team India) दाखल होणार आहे. श्रेयस संघात परतल्यामुळे भारतीय संघातील मधळ्या फळीची ताकद वाढली आहे.

ऑस्ट्रेलियाचं टेन्शन आणखीच वाढणार!

नागपुरात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले होते. विराट कोहली, केएस भरत आणि सूर्यकुमार यादव यांना फारशी चमक दाखवता आली नव्हती. मात्र, असं असून सुद्धा टीम इंडियाने या सामन्यात ऑस्ट्रेलियावर १ डाव आणि तब्बल १३२ धावांनी विजय मिळवला होता. (Latest Sports Update)

आता दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाल्याने टीम इंडियाच्या मधल्या फळीची ताकद वाढणार आहे. मात्र, श्रेयस नेमकी कुणाची जागा घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रेयसच्या जागी संघ व्यवस्थपनाने सूर्यकुमार यादवला कसोटी संघात स्थान दिले होते.

बांगलादेशात श्रेयसची धमाकेदार कामगिरी

बांगलादेशमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी केली होती. त्याने कठीण काळात नाबाद 29 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. याशिवाय पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात श्रेयसने अनुक्रमे ८७ आणि ८६ धावांची खेळी केली होती.

त्याआधी अय्यरने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तुफानी खेळी खेळली होती. श्रेयसने आतापर्यंत खेळलेल्या ७ कसोटी सामन्यांच्या १२ डावात ६५.१३ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. अय्यर हा फिरकी गोलंदाजीचा सर्वोत्तम फलंदाज आहे. या मालिकेतही अशाच खेळपट्ट्या होणार आहेत, अशा परिस्थितीत तो ऑस्ट्रेलियासाठी मोठा धोका ठरू शकतो.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com