चेन्नई संघाचा मुख्य खेळाडू आयपीएलबाहेर saam tv
Sports

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला जबरा झटका, स्टार खेळाडू स्पर्धेतून आऊट, कोण आहे तो?

chennai super kings star pacer injured before ipl 2026 : आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्याआधीच महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू दुखापतीमुळं संपूर्ण स्पर्धा खेळू शकणार नाही.

Nandkumar Joshi

मागील वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. हे सर्व विसरून यंदा जबरदस्त कमबॅक करण्याच्या तयारीत असलेल्या चेन्नई संघाला आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधीच तगडा झटका मिळाला आहे. चेन्नईचा स्टार गोलंदाज स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे गोलंदाजी कमकुवत होण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस दुखापतीमुळं संपूर्ण स्पर्धेतून बाद झाला आहे. स्पर्धेच्या तोंडावरच एलिसला दुखापत झाली आहे. त्यामुळे चेन्नईची गोलंदाजी कमकुवत झाली असून, त्याचा स्ट्रॅटेजीवर परिणाम होणार आहे.

स्पोर्ट्सस्टारच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन एलिसला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनं ग्रासलं आहे. स्पर्धा सुरू होण्याच्या आधी तो दुखापतीतून सावरणं कठीण आहे. इतकंच नाही स्पर्धा सुरू असतानाही तो दुखापतीतून सावरण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या हवाल्याने स्पोर्ट्सस्टारने हे वृत्त दिले आहे. चेन्नई संघाला हा मोठा झटका आहे आणि एलिसच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा शोध सुरू झाला आहे, असेही विश्वनाथन यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

एलिस या वर्षाच्या सुरुवातीपासूनच दुखापतग्रस्त झाला होता. बीबीएलमध्येच त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेचे अखेरचे सामने खेळू शकला नव्हता. त्यानंतर तो टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी तंदुरुस्त झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याने चार सामन्यांत पाच विकेटही घेतल्या होत्या. अलीकडेच ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मालिकेच्या अंतिम सामन्यात खेळल्यानंतर त्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. त्याला पुन्हा त्रास जाणवू लागला होता.

चेन्नईच्या रणनीतीला झटका

चेन्नई सुपर किंग्जने मागील पर्वाच्या आधी मेगा ऑक्शनमध्ये नॅथन एलिसला २ कोटी रुपयांच्या बेस प्राइसला खरेदी केले होते. मात्र, आयपीएल २०२५ मध्ये त्याला केवळ एकच सामना खेळायला मिळाला होता. त्यात त्याने एक विकेट घेतली होती. संघ व्यवस्थापनाने त्याला रिटेन केले होते. त्याला चेन्नईच्या गोलंदाजीचा मुख्य कणा मानलं जात होतं. पण आता तो स्पर्धेबाहेर गेल्यानं संघाला मोठा हादरा बसला आहे, असं बोललं जात आहे.

चेन्नई संघ आता एलिसची जागा भरून काढण्यासाठी खेळाडूच्या शोधात आहे. एखाद्या विदेशी खेळाडूला संधी दिली जाते की इंग्लंडचा ऑलराउंडर जेमी ओव्हर्टन यालाच संपूर्ण स्पर्धेत संधी दिली जाईल हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी|VIDEO

पाकिस्ताननं फिरवला भिकेचा कटोरा, बुडत्या पाकला उधारीचा आधार

तरुणांच्या लग्नात भूकंपाचं विघ्न, 200 लग्नाळू तरुणांना मुलगी मिळेना

Amboli Ghat accident : आंबोली घाटात भयंकर अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, बापाच्या डोळ्यासमोर लेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT