CSK vs GT 
क्रीडा

CSK vs GT : CSK चा सलग दुसरा विजय; गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे गुजरात टायटन्स ढेर

CSK vs GT : सीएसकेने दिलेलं आव्हान पार करताना गुजरात संघाची दमछाक झाली. निर्धारित २० षटकात गुजरातच्या संघाने १४३ धावा केल्या.

Bharat Jadhav

Csk Vs Gt Csk Win By 63 Runs :

चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघात सामना झाला. दमदार फेटकेबाजी करत चेन्नईने दिलेल्या २०७ धावांचं आव्हान पार करताना गुजरातच्या फलंदाजांची दमछाक झाली. डोंगराएवढं आव्हान समोर असल्याचं पाहून गुजरातच्या संघाने आत्मविश्वास आधीच गमावला होता. कमी आत्मविश्वासासोबत मैदानात उतरलेल्या गुजरातचा संघ अवघ्या १४३ धावा करू शकला. गुजरातला पराभव केल्यानंतर सीएसकेचा हा सलग दुसरा विजय आहे. चेन्नईने पहिल्या सामन्यात आरसीबीला पराभूत केलं. (Latest News)

गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गुजरातकडून फलंदाजीचं आमंत्रण आल्यानंतर सीएसकेने गुजरातसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. हे आव्हान पार करताना गुजरातच्या संघाने २० षटकांत ८ गडी गमावत १४३ धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत गुजरातच्या फलंदाजांना नाकीनऊ आणलं. मुस्तफिजुर रहमान, दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांच्यासह सर्व गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. चहर, मुस्तफिझूर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. मथिसा पाथिराना आणि डॅरेल मिशेल यांना १-१ विकेट मिळाल्या.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ३७ धावा केल्या. वृद्धिमान साहा आणि डेव्हिड मिलरने २१-२१ धावा केल्या. विजय शंकर १२ धावा करून बाद झाला तर अजमतुल्ला ओमरझाई ११ धावा करून बाद झाला. राहुल तेवतिया ६ धावा करून बाद झाला तर राशिद खान १ धावा करून बाद झाला. उमेश यादव १० धावा केल्यानंतर नाबाद राहिला आणि स्पेन्सर जॉन्सन ५ धावा केल्यानंतरही नाबाद राहिला.

शिवम दुबेने २३ चेंडूत ५१ धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी ४६-४६ धावा केल्या. शेवटच्या षटकात समीर रिझवीने पहिला आयपीएल सामना खेळताना कमाल केली. रिझवीने ६ चेंडूत १४ धावा केल्या. आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला. गुजरातकडून राशिद खानने २ बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT