Marnus Labuschagne And Mohammed Siraj saam tv
क्रीडा

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Marnus Labuschagne And Mohammed Siraj: पहिल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात मार्नस लाबुशेन चिटींग करत असल्याचा दावा करण्यात आला. यावेळी लाबुशेन आणि मोहम्मद सिराज यांच्यामध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाल्याचं समोर आलं.

Surabhi Jagdish

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामघ्ये पहिला टेस्ट सामना पर्थमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात दोन्ही देशांच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केलीये. टीम इंडिया अवघ्या १५० रन्सवर ऑलआऊट झाली आहे. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात मार्नस लाबुशेन चिटींग करत असल्याचा दावा करण्यात आला. यावेळी लाबुशेन आणि मोहम्मद सिराज यांच्यामध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाल्याचं समोर आलं.

लाबुशेन आणि सिराज यांच्यामध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाबुशेन आणि सिरीजमध्ये नेमकं काय घडलं ते पाहूयात.

सिराज-लाबुशेनमध्ये काय घडलं?

ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. मात्र सिराजने टाकलेला बॉल लाबुशेनला कळला नाही. यावेळी तो बॉल त्याच्या बॅटला लागून त्याच्या पायापाशी राहिला. यावेळी लाबुशेन क्रिझमधून काहीसा बाहेर आला होता. सिराजला ही संधी गमवायची नव्हती आणि लाबुशेनला रनआऊट करण्यासाठी पुढे धावला. सिराज बॉलच्या जवळ आला तेव्हा लाबुशनने बॅटने बॉल दूर केला.

दरम्यान याबाबत सिराजने अंपायरकडे अपील देखील केलं. मात्र अंपायरकडून त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मिळाली नाही. यावेळी लाबुशेन आणि सिराज यांच्यामध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान यामध्ये विराटनेही उडी घेतली असून त्याने नंतर बॉलने थेट बेल्स उडवले.

टीम इंडियाची खराब फलंदाजी

पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र यावेळी भारतीय फलंदाजांसाठी हा निर्णय काही साजेसा ठरला नाही. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाचा डाव 49.4 ओव्हर्समध्ये 150 रन्समध्ये गुंडाळला गेला. यादरम्यान संघाकडून टेस्ट डेब्यू करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४१ रन्सची खेळी केली. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना देखील साजेसा खेळ करता आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT