Hardik Pandya and Murali Kartik Fight saam tv
Sports

Hardik Pandya: भर मैदानात राडा! हार्दिक पंड्या-मुरली कार्तिकमध्ये जोरदार भांडणं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

Hardik Pandya and Murali Kartik Fight: नुकत्याच झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या आणि माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिक यांच्यात मैदानावर वाद झाला.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात टी-२० सिरीज खेळवली जातेय. टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पंड्या या टीमचा भाग आहे. या ५ सामन्यांच्या सिरीजचा दुसरा सामना शुक्रवारी रायपूरमध्ये खेळला गेला. दरम्यान या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्या आणि मुरली कार्तिक यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं दिसून येतंय.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक प्रॅक्टिससाठी मैदानात येत असल्याचं दिसतंय. मैदानात येताच त्याला माजी खेळाडू मुरली कार्तिक भेटतो. पहिल्यांदा तो त्याला हँडशेक करतो. मात्र त्यानंतर त्याची मुरली कार्तिकशी जोरदार बाचाबाची होते. ही बाचाबाची मोठ्या वादात रूपांतरित होत असल्याचं पाहायला मिळतंय.

का झाला हार्दिक-मुरलीमध्ये वाद?

हार्दिक आणि मुरली कार्तिक यांच्यात मोठा वाद झाल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वीचा असल्याचं सांगण्यात येतंय. कॅप्शनमध्ये लिहिलंय की, रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी हार्दिक पांड्या मुरली कार्तिकवर रागावला होता. हार्दिक आणि मुरली कार्तिक यांच्यात मोठी बाचाबाची झाली.

बराच वेळ झाली दोघांमध्ये चर्चा

हार्दिक आणि मुरली कार्तिक बराच वेळ वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला हार्दिक कार्तिकशी बोलणं टाकून निघून जाताना दिसतो. मात्र असं असूनही तो जवळ येतात बोलू लागतात.

हार्दिक पंड्याची न्यूझीलंड दौऱ्यावर कामगिरी

नागपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये हार्दिकने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने फलंदाजी करत २५ रन्स केले आणि एक विकेट घेतली. दुसऱ्या टी२० मध्ये हार्दिकला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही. मात्र या सामन्यात त्याला एक विकेट मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५० पर्यंत अंक मोजता येईना, बापाचं डोकं सटकलंं, रागाच्या भरात लेकीला मार-मार मारलं अन्....

WhatsApp Update: QR कोड आणि 6 डिजिट PIN; आता मुलांच्या WhatsAppवर राहील पालकांची नजर; मेटानं आणलं नवं फीचर

Date Benefits: दररोज दोन खजूर खाल्ल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Vastu Tips: घरात सतत पैशांची चणचण भासतेय? मग या 5 वास्तू टिप्स नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्हा नियोजनमधील अखर्चित निधीवरून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

SCROLL FOR NEXT