ipl delhi capitals vs punjab kings match saam tv
क्रीडा

IPL 2022: बीसीसीआयनं दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्जच्या लढतीचे ठिकाण बदललं

उद्या पुन्हा दिल्ली कॅपिटल्सच्या पथकाची सकाळी RT-PCR चाचणीची दुसरी फेरी घेण्यात येईल असे बीसीसीआयचे सचिव जय शहा (jay shah) यांनी स्पष्ट केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

पुणे : दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघातील तसेच त्यांच्या पथकातील पाच जणांना कोविड-19 (covid19) याची लागण झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज (मंगळवार) दिल्ली कॅपिटल विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यातील (ipl2022) सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना पुणे (pune) एेवजी ब्रेबॉर्न (Brabourne Stadium) येथे खेळविला जाणार आहे. (delhi capitals vs punjab kings latest marathi update)

दिल्ली कॅपिटल्सच्या पथकातील पॅट्रिक फरहत, चेतन कुमार, मिशेल मार्श, डॉ अभिजित साळवी तसेच आकाश माने या पाच जणांना काेविड 19 ची लागण झाली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. या सर्वांची लागण झाल्यापासून सहा दिवसानंतर चाचणी केली जाणार आणि त्यानंतर त्याचा अहवाल (दोन्ही चाचण्या) निगेटिव्ह आल्यास त्यांना पुन्हा दिल्ली कॅपिटल्स बायो-सिक्युर्ड बबलमध्ये पुन्हा समावेश केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण दिल्ली कॅपिटल्सच्या पथकाची दैनंदिन RT-PCR चाचणी प्रक्रियेअंतर्गत ठेवण्यात आली आहे. आज (मंगळवार) घेण्यात आलेल्या RT-PCR चाचण्यांच्या चौथ्या फेरीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

उद्या पुन्हा दिल्ली कॅपिटल्सच्या पथकाची सकाळी RT-PCR चाचणीची दुसरी फेरी घेण्यात येईल असे बीसीसीआयचे सचिव जय शहा (jay shah) यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT