श्रेयस अय्यरने टीममधून अचानक माघार घेतली.
वैयक्तिक कारणांमुळे अय्यरने निवड सोडली.
ध्रुव जुरेल आता इंडिया ए चा कर्णधार आहे.
इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील चार दिवसांची अनऑफिशियल टेस्ट सिरीज सध्या रंगात आली आहे. या सिरीजमधील दुसऱ्या सामन्यापूर्वीच इंडिया ए टीमला मोठा धक्का बसला आहे. लखनऊमध्ये सुरू झालेल्या या सामन्याच्या आधीच टीमचा कर्णधार आणि मिडल ऑर्डरचा महत्त्वाचा फलंदाज श्रेयस अय्यरने अचानक टीममधून माघार घेतली आहे.
श्रेयस अय्यरने अचानक लखनऊ सोडून मुंबईला परतण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार त्याने बीसीसीआयला वैयक्तिक कारणं सांगून टीमतून माघार घेतली आहे. अय्यरच्या गैरहजेरीत पहिल्या सामन्यात उपकर्णधार असलेला विकेटकीपर-फलंदाज ध्रुव जुरेल आता टीमचं नेतृत्व करणार आहे.
अय्यरच्या जागी कोणताही दुसरा खेळाडू टीममध्ये घेतलेला नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितलं की, अय्यरने निवड समितीला कळवलं आहे की, तो दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. पण तरीही वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी सिरीजसाठी टीममद्ये स्थान मिळवण्यासाठी तो अजूनही चर्चेत आहे.
अय्यरचा अलीकडचा खेळ फारसा चमकदार राहिलेला नाही. पहिल्या अनऑफिशियल टेस्टमध्ये त्याने फक्त 8 रन्स केले होते. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत वेस्ट झोनसाठी खेळताना त्याने केवळ 25 आणि 12 रन्स केलेत. तरीही त्याच्याकडे निवड समितीचं लक्ष कायम आहे. कारण याच वर्षीच्या सुरुवातीला भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताना अय्यरने 48.60 च्या सरासरीने 243 रन्स करत मोलाचा वाटा उचलला होता. त्याचप्रमाणे आयपीएलमध्येही त्याने कर्णधार आणि खेळाडू म्हणून जबरदस्त कामगिरी केली होती.
आता वेस्ट इंडिज सिरीजसाठी अय्यरचा टीममध्ये समावेश होतो की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान टीममध्ये आणखी एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला खलील अहमदच्या जागी टीममध्ये घेतलं आहे.
ही सिरीज अनेक तरुण खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण याच संधीवरून त्यांची कामगिरी पाहिली जाणार आहे. ज्यांच्या खेळ चांगला असेल त्यांनाच पुढे वरिष्ठ टेस्ट टीममध्ये स्थान मिळण्याची संधी मिळणार आहे.
इंडिया ए च्या दुसऱ्या सामन्यापूर्वी कोणी टीम सोडली?
कर्णधार श्रेयस अय्यरने टीम सोडली.
श्रेयस अय्यरने टीममधून माघार का घेतली?
वैयक्तिक कारणांमुळे त्याने माघार घेतली.
अय्यरच्या जागी कोण टीमचे नेतृत्व करणार आहे?
ध्रुव जुरेल आता इंडिया ए चा कर्णधार आहे.
अय्यरच्या अलीकडच्या कामगिरीबद्दल काय म्हटले जाते?
त्याचा फॉर्म सामान्य आहे, पण निवड समिती लक्ष ठेवते.
इंडिया ए टीममध्ये कोणता गोलंदाज जोडला गेला?
मोहम्मद सिराजला खलील अहमदच्या जागी घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.