HS Prannoy Saam tv
Sports

BWF World Championships 2023: जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं पदक पक्कं! दोन वेळा विश्वविजेत्याला हरवून प्रणॉयची सेमिफायनलमध्ये धडक...

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं पदक पक्कं! दोन वेळा विश्वविजेत्याला हरवून प्रणॉयची सेमिफायनलमध्ये धडक...

Satish Kengar

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2023:

भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने शुक्रवारी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी करून भारतासाठी पदक पक्के केले आहे.

प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरीत 68 मिनिटांच्या रोमहर्षक लढतीत दोन वेळचा गतविजेता डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनचा पराभव केला, जो सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रणॉयने व्हिक्टर ऍक्सेलसेनचा 13-21, 21-15, 21-16 असा तीन गेमच्या लढतीत पराभव करून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सध्या जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेला प्रणॉय आता उपांत्य फेरीत पोहोचला असून या फेरीत त्याचा सामना थायलंडच्या Kunlavut Vitidsarn शी होईल. उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या टीडब्ल्यू वांगला पराभूत करणारा Vitidsarn हा प्रणॉयला खडतर आव्हान देऊ शकतो. (Latest Marathi News)

सात्त्विक-चिरागचा BWF मधील प्रवास संपला

सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जागतिक दुसऱ्या क्रमांकाची पुरुष दुहेरी जोडी शुक्रवारी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडली. उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या अँडर्स रासमुसेन आणि किम अस्ट्रप यांनी 48 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-18, 21-19 ने त्यांना पराभूत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT