Stuart Broad  Saam Tv
Sports

Broad- Anderson: 'ही दोस्ती तुटायची नाय..' ब्रॉड-अँडरसनच्या जोडीने कसोटीत रचला इतिहास; वॉर्न- मॅकग्रालाही टाकलं मागे

या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉन्व्हेला बाद करताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालत इतिहास रचला आहे.

Saam TV News

Broad -Anderson: इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉन्व्हेला बाद करताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालत इतिहास रचला आहे.

इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांची जोडी सुपरहिट जोडी आहे. दरम्यान स्टुअर्ट ब्रॉडने डेवोन कॉन्व्हेला बाद करताच जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये १००२ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यासह जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या जोडीने ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्नचा विक्रम मोडून काढला आहे. (Latest Sports Updates)

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १००२ गडी बाद केले आहेत. तर यापूर्वी हा विक्रम ग्लेन मॅकग्रा आणि वॉर्नच्या नावे होता. दोघांनी मिळून १००१ गडी बाद केले होते.

सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या जोडया..

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड - १००२ गडी*

शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा - १००१ गडी

मुथय्या मुरलीधरन आणि चामिंडा वास - ८९५ गडी

कोर्टनी वॉल्श आणि कर्टली ॲम्ब्रोस- ७६२ गडी

जेम्स अँडरसनने २००३ मध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले होते. तर ४ वर्षानंतर स्टुअर्ट ब्रॉडला आपला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली.

जेम्स अँडरसनने आतापर्यंत खेळलेल्या एकूण १७७ कसोटी सामन्यांमध्ये ६७५ गडी बाद केले आहेत. तर स्टुअर्ट ब्रॉडने आतापर्यंत खेळलेल्या १५९ सामन्यांमध्ये ५६६ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT