Nitu Ghanghas
Nitu Ghanghas Saam tv
क्रीडा | IPL

Commonwealth Games 2022 : नितू घनघासची सुवर्णपदकाला गवसणी

Vishal Gangurde

नवी दिल्ली : बर्मिंघम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदाकाची भर पडली आहे. आज प्रसिद्ध बॉक्सर अमित पंघलने (Amit Panghal) सुवर्णपदक (Gold Medal) जिंकल्यानंतर आता महिला बॉक्सर नितू घनघासने (Nitu Ghanghas) सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर आतापर्यंत भारताच्या खात्यात १७ सुवर्ण, १३ रौप्य आणि १९ कांस्य अशी एकूण ४९ पदके जमा झाली आहेत. (boxer Nitu Ghanghas News)

नितूने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेमी-जेड रेसटानचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. २१ वर्षीय नितूने पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला. तिने २०१९ साली जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेती डेमीचा ५-० या मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. नितू मागच्या सामन्यात ज्या प्रकारे खेळली, त्याच प्रकारे खेळत तिने सुवर्णपदक जिंकलं आहे. तिने संपूर्ण ९ मिनिटे सामन्याच्या तिन्ही फेरीत संयम राखत विरोधी स्पर्धकाचा दारूण पराभव केला.

दरम्यान, आजच प्रसिद्ध बॉक्सर अमित पंघलनेही दमदार कामगिरी केली. त्यानेही आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये अमितला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. पण यंदा ५१ किलो वजनी गटात पंघलने सूवर्ण कामगिरी केली. त्यामुळे भारताची राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये पदकांची लयलूट सुरुच असून एकूण ४९ पदकांची कमाई केली आहे. सामन्याच्या अंतिम फेरीत अमितने मॅकडोनाल्डवर आक्रमक खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patanjali Products: बाबा रामदेव यांना मोठा झटका, पतंजलीच्या १४ प्रकारच्या औषधांवर बंदी; उत्तराखंड सरकारचा निर्णय

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

SCROLL FOR NEXT