Paras Mhambrey Statement SAAM TV
Sports

Paras Mhambrey Statement: बॉलिंग कोचची गुगली; बुमराह,शमी नव्हे तर या गोलंदाजाचं गायलं गुणगान

Paras Mhambrey On Hardik Pandya: भारतीय संघातील गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी संघातील गोलंदाजाचं कौतुक केलं आहे.

Ankush Dhavre

Paras Mhambrey On Hardik Pandya:

भारतीय संघाने आशिया चषकात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका आणि पाकिस्तान संघावर जोरदार विजय मिळवला.

या सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने दमदार कामगिरी केली आहे. दरम्यान या कामगिरीची दखल घेत भारतीय संघातील गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी हार्दिक पंड्याचे कौतुक केलं आहे.

हार्दिक पंड्याबद्दल बोलताना पारस म्हांबरे म्हणाले की, 'हार्दिक पंड्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. त्याचा मला नक्कीच आनंद होतोय. आम्ही बराच काळ या गोष्टीवर काम करत आहोत. आम्ही त्याच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करत आहोत. आम्हाला खात्री करून घ्यायची आहे की, तो पुर्णपणे फिट आहे.'

तसेच ते पुढे म्हणाले की, 'जेव्हा तो ताशी १४० किमीच्या गतीने गोलंदाजी करतो त्यावेळी तो वेगळाच गोलंदाज असतो. आमच्या संघाच्या दृष्टीने तो आमच्यासाठी विकेट टेकिंग गोलंदाज आहे.'

हार्दिक पंड्याने या स्पर्धेत फलंदाजीत आणि गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने ८७ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याला गोलंदाजी करायची संधी मिळाली नव्हती. सुपर ४ फेरीत पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने १ गडी बाद केला होता. त्यानंतर श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याने १ गडी बाद केला होता. (Latest sports updates)

भारतीय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश..

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरूद्धचा सामना भारतीय संघासाठी निर्णायक ठरला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवला.

आता भारतीय संघासोबत अंतिम फेरीत भिडण्यासाठी श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Bharat Video : धक्कादायक! नमो भारत ट्रेनमधील 'त्या' कपलचा दुसरा व्हिडिओ व्हायरल

CSMT रेल्वे स्थानकावर AI वापरून बनावट पास; तरुणावर गुन्हा दाखल|VIDEO

Special Fruit Juice: हिवाळ्यातील 'हा' ज्यूस प्यायल्याने स्किन आणि पचनासाठी ठरेल फायदेशीर

Maharashtra Live News Update: अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडवरील सिटी मॉलच्या टेरेसला आग

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बैठकीत राडा, बडा नेता ढसाढसा रडला

SCROLL FOR NEXT