IND vs BAN: Asia Cup 2023 : टीम इंडियासाठी गुड न्यूज; श्रेयस अय्यर कमबॅकसाठी सज्ज! प्लेइंग ११ मधून कोण जाणार बाहेर?

India vs Bangladesh, Shreyas Iyer Comeback: श्रेयस अय्यर आल्यानंतर कोणता खेळाडू संघाबाहेर जाणार?
India vs Bangladesh, Shreyas Iyer Comeback
India vs Bangladesh, Shreyas Iyer ComebackSaam tv

IND vs BAN: Asia Cup 2023:

भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंका आणि पाकिस्तानला धुळ चारत भारतीय संघाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सुपर ४ फेरीत भारतीय संघाचा शेवटचा सामना शुक्रवारी बांगलादेश संघासोबत रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर मैदानावर सराव करताना दिसून आला आहे.

India vs Bangladesh, Shreyas Iyer Comeback
Viral Video: १६ वर्षांपूर्वी टीम इंडियाने रचला होता इतिहास! पाहा भारत- पाकिस्तान सामन्यातील बॉल आऊटचा थरार -VIDEO

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात राहावं लागलं संघाबाहेर..

सुपर ४ फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याची माहीती समोर आली होती.

तो पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. त्यामुळे त्याच्याऐवजी केएल राहुलचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला होता. या सामन्यात केएल राहुलने शतकी खेळी केली होती. त्यानंतर श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यातही त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं. मात्र माध्यमातील वृ्त्तानूसार श्रेयस अय्यर फिट असून तो सराव करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात ज (Latest sports updates)

भारतीय संघाने गाठली अंतिम फेरी..

भारतीय संघ सुपर ४ फेरीत ४ गुणासंह अव्वल स्थानी आहे. सुपर ४ फेरीतील पहिल्या सामन्यात भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने २२८ धावांनी विजय मिळवला होता.

तर दुसऱ्या सामन्यात भारत आणि श्रीलंकेची लढत पाहायला मिळाली होती. या लढतीत भारतीय संघाने ४१ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं होतं.

श्रीलंका-पाकिस्तानात लढत..

भारतीय संघाचा सामना बांगलादेश संघाविरूद्ध रंगणार आहे. तर गुरूवारी श्रीलंका आणि पाकिस्तान दोन्ही संघांमध्ये निर्णायक लढत रंगणार आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. भारतीय संघ गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर २ गुणांसह श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानी आणि पाकिस्तानचा संघ २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com