CSMT रेल्वे स्थानकावर AI वापरून बनावट पास; तरुणावर गुन्हा दाखल|VIDEO

AI Used To Create Fake Railway Pass In Mumbai: CSMT रेल्वे स्थानकावर AI चा वापर करून बनावट लोकल रेल्वे पास तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 22 वर्षीय तरुणावर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून AI च्या गैरवापराचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे.

AI च्या वाढत्या वापरामुळे फसवणुकीचे नवे प्रकार समोर येत असून, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चॅटजीपीटीसारख्या AI टूलचा वापर करून बनावट लोकल रेल्वे पास तयार केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

आदिल अन्सार खान असे आरोपीचे नाव असून, त्याने मुंब्रा ते CSMT दरम्यान प्रवासासाठी एक महिन्याचा बनावट रेल्वे पास तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. तिकीट तपासणीदरम्यान पास संशयास्पद वाटल्याने अधिक चौकशी करण्यात आली. तपासात हा पास अधिकृत रेल्वे प्रणालीत नोंदणीकृत नसल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस चौकशीत आरोपीने AI चा वापर करून पासवरील मजकूर, रचना आणि लेआउट तयार केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणामुळे AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे प्रकार किती धोकादायक पातळीवर पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com