Bowler slaps his own player saam tv
Sports

Video: क्रिकेट नव्हे तर कुस्तीचा आखाडा! भर मैदानात गोलंदाजाने आपल्याच खेळाडूचं थोबाड फोडलं; रक्तबंबाळ झाला खेळाडू

PSL 2025: विकेट घेतल्यानंतर गोलंदाज जोशात येऊन त्यांच्या पद्धतीने सेलीब्रेशन करतात. मात्र पाकिस्तान सुपर लीगमध्ये विकेटनंतर सेलीब्रेशन करणं खेळाडूला चांगलाच महागात पडलंय. नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

जेव्हापासून पाकिस्तान सुपर लीगला सुरुवात झाली आहे तेव्हापासून काही ना काही वाद किंवा विचित्र गोष्टी घडताना दिसतायत. यामुळे संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचं हसं होतंय. कधी स्टेडियमचे लाईट्स जाणं, कधी सामनावीर पुरस्कार म्हणून हेअर ड्रायर देणं किंवा ड्रेसिंग रूमच्या गोष्टी बाहेर येणं अशा अनेक गोष्टी पीसीएलमध्ये घडतायत. अशातच आता यामध्ये अजून एक प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून आणि पाहून तुम्हाला हसू रोखू शकता येणार नाही.

आयपीएलमध्ये झालेला थप्पड कांड तुम्हाला नक्की आठवत असेल. त्यावेळी टीम इंडियाच्या या दोन्ही खेळाडूंचा वाद चांगलाच चर्चेत होता. मात्र आता असंच काहीसं प्रकरण पाकिस्तानच्या मैदानावर घडलं आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये एका प्लेयरने त्याच्याच टीमच्या खेळाडूला मारलं असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

PSL मध्येही ‘थप्पड़ कांड’?

पाकिस्तान सुपर लीगमध्ये २२ एप्रिलला मुल्तान सुल्तांस विरूद्ध लाहौर कलंदर्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात हे प्रकरण घडलं आहे. मुख्य म्हणजे या खेळाडूने जाणूनबुजून समोरच्या खेळाडूला मारलं नाही. उबैद शाह आणि उस्मान खान असं या खेळाडूंची नावं आहेत.

कधी घडला हा प्रकार?

लाहोर कलंदर्सच्या इनिंगमध्ये १५ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर उबैद शाहने सॅम बिलिंग्सची विकेट घेतली. यावेळी विकेट घेतल्यानंतर तो इतका खूश झाला की त्याने उत्साहाच्या भरात विकेटकीपरला टाळी दिला. मात्र गोलंदाजाचा हात विकेटकिपरच्या हातावर न बसता थेट तोंडावर बसला. यावेळी उस्मान खानला दुखापत झाली आणि तो जमीनीवर पडला. त्याचे नाकातून रक्तस्राव देखील झाला. दुखापत होऊनही उस्मान खानने मैदान सोडलं नाही. तो सामन्यात विकेटकीपिंग करत होता.

मुल्तान सुल्तांसचा विजय

दरम्यान या सामन्यात मुल्तान सुल्तांस टीमचा विजय झाला. त्यांनी लाहोल कलंदर्सला ३३ रन्सने पराभूत केलं. या सामन्यात पहिल्यांचा फलंदाजी करताना मुल्तान सुल्तांसने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावून २२८ रन्स केले. तर लाहोर कलंदर्सला २० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स गमावून केवळ १९५ रन्स करता आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT