IND vs AUS 3rd Test Latest Updates Saam TV
Sports

IND vs AUS : रोहित शर्माचं टेन्शन वाढवणारी बातमी; स्टीव्ह स्मिथने आखला मोठा प्लॅन, टीम इंडिया फसणार?

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारतीय फलंदाजांना झटपट माघारी पाठवण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे.

Satish Daud

IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका सुरू आहे. पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केलाय. आता मालिकेचा तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून इंदूरमध्ये खेळवण्यात येईल. विजय मिळवल्यास टीम इंडियाचं कसोटी विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्क होऊ शकतं. (Latest Sports Updates)

मात्र, त्याआधीच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारतीय फलंदाजांना झटपट माघारी पाठवण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर इंदूर कसोटीत मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारतीय (Team India) फिरकीपटूंना चांगली साथ लाभली होती. कारण, नागपूर आणि विशेषत: दिल्लीमध्ये काळ्या मातीची खेळपट्टी बनवण्यात आली होती. या खेळपट्टीवर रवींद्र जडेजा, रवीचंद्रन आश्विन यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकलं होतं. मात्र, आता इंदूरमधील तिसरा कसोटी सामन्यात लाल मातीची खेळपट्टी बनवली जाणार असल्याची माहिती आहे.

या खेळपट्टीवर फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळेल. खेळपट्टीनं ऑस्ट्रेलियाच्या वेगवान बॉलर्सला साथ दिल्यास मालिकेतील भारताच्या विजयी वाटचालीवर परिणाम होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ मिशेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन यांना संघात संधी देण्याची शक्यता आहे. दोन्ही गोलंदाज अतिशय भेदक मारा करणारे असल्याने रोहित शर्मा आणि टीम इंडियापुढे तिसऱ्या कसोटीत मोठं आव्हान असणार आहे.  (Latest Marathi News)

दुसरीकडे टीम इंडियाने तिसऱ्या कसोटी (India vs Australia) सामन्यात जर विजय मिळवला तर त्यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळं टीम इंडिया इंदूर कसोटीत तीन वेगवान गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतानं तीन फिरकीपटू उतरवले होते. आता तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया एका वेगवान गोलदाजांला संधी देऊ शकते.

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार) केएल राहूल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एस. भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), स्कॉट बॉलंड, एलेक्स कैरी (विकेटकीपर) कॅमरुन ग्रीन, पीटर हँडसकॉम्ब,ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहमॅन

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT