Billy Vigar Died Age 21 x
Sports

Death : क्रीडा विश्वावर शोककळा; स्टार खेळाडूचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन, मॅचदरम्यान झाली होती दुखापत

Billy Vigar Passes Away: आर्सेनल फुटबॉल क्लबचा माजी फुटबॉलपटू बिली विगरचे रुग्णालयात निधन झाले आहे. फुटबॉल सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. वयाच्या २१ व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली.

Yash Shirke

Billy Vigar Died Age 21 : क्रीडा विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आर्सेनलचा माजी खेळाडू बिली विगरचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन झाले आहे. तरुण वयात त्याने फुटबॉल क्षेत्रात नाव कमावले होते. आर्सेनलसारख्या लोकप्रिय संघाचा तो भाग होता. एका सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि दुखापतीमुळे त्याची प्रकृती खालावली. रुग्णालयात उपचारादरम्यान बिली विगरचे निधन झाले आहे. यामुळे फुटबॉल जगतात शोककळा पसरली आहे.

२० सप्टेंबर २०२५ रोजी ईस्टमन लीग प्रीमियर डिव्हिजनमध्ये चिचेस्टर सिटी आणि विंगेट अँड फिंचले यांच्यात फुटबॉल सामना खेळला गेला. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला विगरने फुटबॉल सीमारेषेजवळ ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तो मैदानाजवळील क्राँक्रीटच्या भिंतीवर जोरात आदळला. लगेच वैद्यकीय पथक मैदानावर पोहोचले. थोड्याच वेळात सामना रद्द करण्यात आला. विगरला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली. त्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. अथक प्रयत्नानंतरही डॉक्टरला त्याला वाचवू शकले नाही. काल २५ सप्टेंबर २०२५ रोजी त्याचे निधन झाले.

आर्सेनलने सोशल मीडिया अकांउटवर पोस्ट शेअर करत बिली विगरच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बिली विगरच्या निधनाच्या धक्कादायक बातमीे आर्सेनल फुटबॉल क्लब खूप दु:खी आहे. बिलीच्या आत्म्याला शांती लाभो, असे आर्सेनलच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. बिली विगरच्या निधनामुळे फुटबॉल जगतात शोककळा पसरली आहे.

बिली विगरने डिसेंबर २०१७ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी फुटबॉल कारकीर्दीची सुरुवात केली. त्याने आर्सेनलसोबत करार केला पण सिनियर टीममध्ये संघात प्रवेश करण्यात तो अपयशी ठरला. तो १८ वर्षांखालील आणि २१ वर्षांखालील विभागात क्लबकडून खेळला. पण सिनियर टीममध्ये त्याला संधी मिळाली नाही. २०२५ मध्ये विगरने चिचेस्टर सिटीसोबत करार केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार मदत द्या - विजय वडेट्टीवार

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT