novak djokovic twitter
क्रीडा

US Open स्पर्धेत आणखी एक मोठा उलटफेर! कार्लोस अल्काराझ पाठोपाठ जोकोविचचीही धक्कादायक एक्झिट

Ankush Dhavre

यूएस ओपनस्पर्धेत आणखी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेतील गतविजेता नोवाक जोकोविचला मोठा धक्का बसला आहे. नुकताच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आलेल्या जोकोविचला एलेक्सी पोपिरिनकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा या स्पर्धेतील दुसरा सर्वात मोठा उलटफेर ठरला आहे. यापूर्वी विम्ब्लडन चॅम्पियन कार्लोस अल्काराझलाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

जोकोविचचा सामनात ऑस्ट्रेलियाच्या पोपिरिनसोबत झाला. या सामन्यात त्याला ४-६,४-६,६-२ आणि ४-६ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. १ तास आणि १९ मिनिटे सुरु राहिलेल्या या सामन्यात जोकोविचच्या हाती निराशा लागली आहे. यावेळी जोकोविचलला २५ वे ग्रँड स्लॅम जिंकण्याची संधी होती. मात्र ही संधी आता हातून निसटली आहे. गेल्या १६ वर्षांत पहिल्यांदाच जोकोविच यूएस ओपन स्पर्धेतील चौथ्या फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला आहे.

सर्वाधिक वेळेस ग्रँड स्लॅम फायनल खेळण्याचा रेकॉर्ड

नोवाक जोकोविचच्या नावावर सर्वाधिक वेळेस ग्रँड स्लॅम फायनल खेळण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ३७ वेळेस ग्रँड स्लॅम फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सर्वाधिक वेळेस ग्रँड स्लॅम फायनल खेळण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने अनेक दिग्गजांना मागे सोडलं आहे. ज्यात रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांचा समावेश आहे.

ही स्पर्धा जिंकून नोवाक जोकोविचला आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी होती. नोवाक जोकोविचने आतापर्यंत २४ वेळेस ग्रँड स्लॅमचा खिताब पटकावला आहे. तर ऑस्ट्रेलियाची महिला टेनिसपटू मार्गरेट कोर्टने देखील २४ वेळेस हा खिताब पटकावला आहे. ही स्पर्धा जिंकून त्याला मार्गरेट कोर्टला मागे टाकण्याची संधी होती. मात्र ही संधी हुकली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT