big update on india vs australia test series venues announced for the series
big update on india vs australia test series venues announced for the series saam tv news
क्रीडा | IPL

IND Vs AUS Test Series : भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबाबत मोठी अपडेट

Ankush Dhavre

IND vs AUS Test Series Venues Latest Updates:

भारतीय संघासाठी २०२४ वर्ष हे अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण यावर्षी भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचं लक्ष ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची हॅट्रिक करण्यावर असणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने ठिकाणांची घोषणा केली आहे.

कुठे रंगणार भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील सामने?

ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये रंगणार आहे. तर दुसरा कसोटी सामना हा डे-नाईट सामना असणार आहे. हा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील तिसरा सामना गाबाच्या मैदानावर रंगणार आहे. तर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे.

हा सामना २६ डिसेंबर रोजी रंगणार आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना २०२५ च्या सुरुवातीला खेळला जाणार आहे. दरम्यान या मालिकेचं वेळापकत्रक अजून समोर आलेलं नाही. (Cricket news in marathi)

भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची मालिका..

ऑस्ट्रेलिया दौरा हा भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मालिका ऑस्ट्रेलियात असल्याने ऑस्ट्रेलियाचं पारडं जड असणार आहे. ही मालिका जर ड्रॉ झाली किंवा भारतीय संघाचा पराभव झाला तर हे भारतीय संघाला महागात पडू शकतं.

कारण ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर तिसऱ्या न्यूझीलंडचा संघ आहे. टॉप २ मध्ये टीकून राहण्यासाठी तिन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. त्यामुळे ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने निर्णायक ठरणार यात काहीच शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

Special Report | ..तर पक्ष फुटला असता! शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT