Nassau Cricket Stadium Not Yet Ready For T20 World Cup Match google
Sports

T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण

India vs Pakistan T20 World Cup 2024 Match Update: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या २ जूनपासून प्रारंभ होतोय. दर २ वर्षातून एकदा खेलवल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा थरार यंदा अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये रंगणार आहे

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या २ जूनपासून प्रारंभ होतोय. दर २ वर्षातून एकदा खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा थरार यंदा अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये रंगणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान लढत ९ जून रोजी पार पडणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्याचा थरार न्यूयॉर्कच्या नासाउ क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र या मोठ्या सामन्यासाठी नासाउ क्रिकेट स्टेडियम सज्ज आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण या स्टेडियमचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड संघाविरुद्ध होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना ९ जून रोजी नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. हा हाय व्हॉल्टेज सामना सुरु व्हायला अवघे ३० दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजूनही नासाउ क्रिकेट स्टेडियम पूर्णपणे तयार झालेलं नाही. है मैदान तयार करण्याचं काम अजूनही सुरुच आहे. या स्टेडियमचे फोटो जोरदार व्हायरल होत असून, भारत- पाकिस्तान सामना याच मैदानावर खेळला जाणार की नाही? असा प्रश्व उपस्थित केला जाऊ लागला आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघातील खेळाडू शानदार कामगिरी करताना दिसून येत आहेत. भारतीय संघाची पहिली लढत आयर्लंडविरुद्ध होईल. त्यानंतर ९ जून रोजी भारतीय संघ पाकिस्तानचा सामना करताना दिसेल.

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ (T20 World Cup Team India Player):

  • रोहित शर्मा (कर्णधार)

  • विराट कोहली

  • यशस्वी जयस्वाल

  • सूर्यकुमार यादव

  • रिषभ पंत (विकेटकीपर)

  • संजू सॅमसन (विकेटकीपर)

  • हार्दिक पांड्या (उपकर्णधार)

  • शिवम दुबे

  • कुलदीप यादव

  • युजवेंद्र चहल

  • अर्शदीप सिंग

  • जसप्रीत बुमराह

  • मोहम्मद सिराज

  • रवींद्र जडेजा

  • अक्षर पटेल

राखीव खेळाडू (Reserved Players)..

  • शुभमन गिल

  • रिंकू सि्ंग

  • खलील अहमद

  • आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अहिल्यानगर हादरले! घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार अन् अमानुष मारहाण, नातेवाईकांनीच केलं भयंकर कृत्य

Sun-Mangal Yuti: 18 वर्षांनी तयार होणार मंगळ-सूर्याची युती; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Maharashtra Live News Update: भोयर बायपासवर रस्त्याच्या मागणीसाठी रास्तारोको

Kitchen Hacks: घरात तुप बनवताया वास येतोय? वापरुन पहा 'या' सोप्या ट्रिक्स

Akkalkuwa : शाळेसाठी दररोज ६० बालकांचा धोकादायक प्रवास; ३ किमी घाट उतरुन जातात अंगणवाडी अन् शाळेत

SCROLL FOR NEXT