Sam Curran Statement: 'खूप वाईट वाटतंय..' दारुण पराभवानंतर सॅम करनने कोणाची माफी मागितली?
Sam curran statement after pbks vs rcb match punjab kings vs royal challengers ipl 2024 amd2000twitter

Sam Curran Statement: 'खूप वाईट वाटतंय..' दारुण पराभवानंतर सॅम करनने कोणाची माफी मागितली?

PBKS vs RCB, IPL 2024: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जवर ६० धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे. तर पराभूत होणारा पंजाब किंग्जचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दरम्यान या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार सॅम करनने माफी मागितली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना तो २२ धावांवर माघारी परतला. तर गोलंदाजीतही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही.

या सामन्यानंतर कर्णधार सॅम करनने पंजाबच्या कामगिरीवर भाष्य केलं. तो म्हणाला की, ' या स्पर्धेत अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. मात्र महत्वाच्या सामन्यांमध्ये आम्हाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. खूप वाईट वाटतंय. आम्ही विराटला लवकरात लवकर बाद करण्याच्या प्रयत्नात होतो. मात्र असं होऊ शकलं नाही. आम्ही फॅन्सला आनंद देऊ शकलो नाही. त्यामुळे मी त्यांची माफी मागतो. मात्र आम्ही लढा देत राहू.'

Sam Curran Statement: 'खूप वाईट वाटतंय..' दारुण पराभवानंतर सॅम करनने कोणाची माफी मागितली?
SRH vs LSG, IPL 2024: लखनऊचे मालक लाईव्ह सामन्यात केएल राहुलवर भडकले; Video तुफान व्हायरल

या सामन्यात नेतृत्वासह गोलंदाजी आणि फलंदाजीतही फ्लॉप ठरला. गोलंदाजी करताना त्याने ५० धावा खर्च करत केवळ १ गडी बाद केला. तर दुसरीकडे फलंदाजी करताना त्याने १६ चेंडूत २२ धावा केल्या.

Sam Curran Statement: 'खूप वाईट वाटतंय..' दारुण पराभवानंतर सॅम करनने कोणाची माफी मागितली?
SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'; मुंबई स्पर्धेतून बाहेर

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ९२ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने ५५ आणि ग्रीनने ४६ धावा करत संघाची धावसंख्या २४१ वर पोहचवली. या धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ ६० धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com