ricky ponting twitter
Sports

IND vs AUS: ना रोहित, ना विराट; BGT मध्ये हा भारतीय फलंदाज धावांचा पाऊस पाडणार, Ricky Ponting ची भविष्यवाणी

Ricky Ponting Prediction For IND vs AUS Test Series: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने बॉर्डर- गावसकर मालिकेपूर्वी मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

Ricky Ponting On Border- Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये येत्या २२ नोव्हेंबरपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये रंगणार आहे.

या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी दिग्गज खेळाडूंनी भविष्यवाणी करायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने या मालिकेबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेत कोणता फलंदाज सर्वाधिक धावा करणार, याबाबत रिकी पाँटिंगने मोठं वक्तव्य केलं आहे. रिकी पाँटिंगच्या मते, रिषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघेही या मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज असतील.

काय म्हणाला रिकी पाँटींग?

कोणता फलंदाज सर्वाधिक धावा करणार? असा प्रश्न विचारला असता, रिकी पाँटिंग म्हणाला, ' मला वाटतं स्टीव्ह स्मिथ सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल. कारण तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी परतला आहे.त्यामुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो चांगली फलंदाजी करु शकतो सिद्ध करुन दाखवण्याची नामी संधी त्याच्याकडे असणार आहे. तर भारतीय संघाकडून माझ्या मते, रिषभ पंत सर्वाधिक धावा करु शकतो. कारण तो सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.

मालिका कोणता संघ कोण जिंकणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये होणारी कसोटी मालिका कोण जिंकणार? याबाबत रिकी पाँटींगने आधीच भविष्यवाणी केली आहे. रिकी पाँटींगच्या मते, ऑस्ट्रेलिया ही मालिका ३-१ ने आपल्या नावावर करणार.

ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्यामुळे भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. भारतीय संघाला जर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी मालिका कुठल्याही परिस्थितीत ४-१ ने जिंकावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT