Hardik Pandya Latest Injury Update google
क्रीडा

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाच्या फॅन्ससाठी वाईट बातमी; हार्दिकबाबत समोर आली मोठी अपडेट

Hardik Pandya Injury Update: पहिला कसोटी सामना झाल्यानंतर या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. यादरम्यान हार्दिक पंड्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya Latest Injury Update:

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कवर सुरु आहे. पहिला कसोटी सामना झाल्यानंतर येत्या ३ ते ७ जानेवारीदरम्या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे.

भारतीय संघ मायदेशात परतल्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्ताविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. पहिला कसोटी सामना झाल्यानंतर या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. यादरम्यान हार्दिक पंड्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.

हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त...

नुकताच पार पडलेल्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत हार्दिक पंड्यालाही भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतंय. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान तो गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभवा झाला. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संध ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता.

या मालिकेतही हार्दिक पंड्या खेळताना दिसून आला नव्हता. या मालिकेसाठी भारतीय संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती.ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाला. (Latest sports updates)

हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर?

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिन्ही फॉरमॅटसाठी ३ वेगवेगळ्या कर्णधारांची घोषणा केली होती. टी-२० संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे, केएल राहुलकडे वनडे संघाची तर कसोटी संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी मालिका सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना, हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये असा दावा केला गेला जात आहे की, हार्दिक पंड्या थेट आयपीएल स्पर्धेतून कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.

हार्दिक न खेळल्यास कोण होणार कर्णधार?

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव गोलंदाजी करताना दिसून आला होता. असं म्हटलं जात आहे की, रोहित शर्मा आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा खेळताना दिसून येऊ शकतो. जर रोहित संघात असेल आणि सूर्यकुमार, हार्दिक पंड्या संघाबाहेर असतील तर नेतृत्वाची जबाबदारी रोहितकडे सोपवली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कणकवलीमधून नितेश राणे यांचा विजय

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT