Tilak Verma ICC T20 Ranking saam tv
Sports

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

Tilak Varma ICC T20 Ranking : भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा तिलक वर्मानं आयसीसी टी २० रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. फलंदाजीत सातत्य ठेवणाऱ्या तिलक वर्मानं दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

Nandkumar Joshi

सातत्य असेल तर यश हमखास मिळतंच, याचाच अनुभव सध्या भारताचा युवा क्रिकेटपटू तिलक वर्मा घेतोय. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या टी २० मालिकेत तिलक वर्मा सध्या जबरदस्त कामगिरी करतोय. त्याचंच फळ त्याला मिळालं आहे. याच कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी २० रँकिंगमध्ये त्यानं मोठी झेप घेतली आहे. आता तो थेट टॉप ५ मध्ये पोहोचला असून, पाकिस्तानच्या फलंदाज टॉप ५ मधून बाहेर फेकला गेला आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी २० मालिकेत चांगली कामगिरी केल्याचं फळ तिलक वर्माला आयसीसी टी २० रँकिंगच्या रुपात मिळालेलं आहे. तिलक वर्मा आता टॉप ५ मध्ये पोहोचला आहे. तर भारताचाच युवा फलंदाज अभिषेक शर्मा टी २० रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तिलक वर्माच्या तडाख्यामुळं पाकिस्तानचा साहिबजादा फरहान आणि इंग्लंडचा जोस बटलरचं एकेक स्थानाचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानचा साहिबजादा तर टॉप ५ मधून बाहेर फेकला गेला आहे. तर बटलर हा टॉप ५ मध्ये आहे. तर गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती पहिल्या स्थानी कायम आहे. त्याने करिअरमधील सर्वोच्च रेटिंग मिळवली आहे.

तिलक वर्मा यानं कटकमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या सामन्यात २६ धावा केल्या होत्या. तर चंदीगडमध्ये ६२ धावा, धर्मशालामध्ये २६ धावा केल्या. फलंदाजीत सातत्य राखल्यानं त्याला ताज्या आयसीसी रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. याचवर्षी जानेवारीत तिलक वर्मा हा दुसऱ्या स्थानी पोहोचला होता. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग होती.

दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार एडन मार्करम याला ताज्या टी २० रँकिंगमध्ये २९ स्थानांचा फायदा झाला आहे. त्यानं भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ६१ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. पण त्याची ही खेळी व्यर्थ गेली होती. त्यांचा अख्खा संघ ११७ धावांवरच गारद झाला होता. क्विंटन डीकॉक यानं दुसऱ्या टी २० सामन्यात ९० धावांची तुफानी खेळी केली होती. या इनिंगमुळं त्याला १४ स्थानांचा फायदा झाला आणि तो ५३ व्या स्थानी पोहोचला आहे.

गोलंदाजांमध्ये भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आयसीसी टी २० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. दोन टी २० सामन्यात त्यानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याच्या खात्यात ३६ रेटिंग पॉइंट्स जोडले गेले. त्यानं आपल्या करिअरमधील सर्वोच्च रेटिंग मिळवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar: 'धुरंधर'नं मोडली दक्षिणेची मक्तेदारी; बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ची 400 कोटींची कमाई

ड्रोनने रेकी, महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास; पोलिसांकडून सिनेस्टाईल अटक

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे गोणीत भरले

Blouse for Every Saree: प्रत्येक बाईकडे असायला हवे कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच होणारे हे ७ प्रकारचे ब्लाउज

Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

SCROLL FOR NEXT