Wriddhiman Saha- Syed Kirmani Saam TV
Sports

भारतीय क्रिकेटला ग्रहण! साहानंतर आणखी एका माजी खेळाडूचा मोठा दावा

1983 चा विश्वचषक (1983 World Cup) जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग असलेले एका खेळाडूने असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.

वृत्तसंस्था

ऋद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या भविष्याविषयी माहिती दिली. त्याला निवृत्ती घेण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. आता भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी (Syed Kirmani) यानेही असेच विधान केले आहे. तो म्हणाला की, जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता तेव्हा त्याला काहीही न बोलता संघातून वगळण्यात आले होते. 1983 चा विश्वचषक (1983 World Cup) जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग असलेले सय्यद किरमाणी म्हणाले की, साहाप्रमाणेच त्याच्या कारकिर्दीतही त्याच्याशी अन्याय झाला होता. पण त्यावर कोणी बोलत नाही.

किरमाणी याने माध्यामांशी बोलताना सांगितले की, “साहासमोर खूप स्पर्धा आहे. सर्व तरुण आयपीएल आणि इतर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये चांगला खेळ करत आहेत. अर्थात तो खूप दुःखी आहे पण प्रत्येक क्रिकेटपटूला चढ-उतारातून जावे लागते. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन खेळाडूबद्दल काय विचार करतात हे आम्हाला माहित नाही. माझ्यावरही अन्याय झाला आहे पण त्यावर कोणी बोलत नाही''.

'मला दोष नसताना संघातून बाहेर काढले'

किरमाणी याने 1976 ते 1988 पर्यंत भारतासाठी 88 कसोटी आणि 49 एकदिवसीय सामने खेळले. प्रसार माध्यमांमध्ये त्यावेळी आपल्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली होती आणि खोट्या बातम्या छापण्यात आल्या होत्या. ज्यामुळे मैदानावर आपण चुका करतो अशी प्रतिमा निर्माण केली होती, असा दावा त्यांनी केला.

किरमाणी म्हणाला, मला माहित नाही त्यावेळी मी माझ्या करिअरच्या शिखरावर होतो. तरीही मला कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही संघातून कोणतीही चूक न करता वगळण्यात आले होते. माझ्या आजूबाजूला स्पर्धा नव्हती. मी 88 कसोटी खेळलो आणि अनेक प्रसंगी भारतीय एकदिवसीय संघाला वाचवले. मी खराब कामगिरी करत असल्याच्या चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या हे तुम्हाला माहीत आहे का? स्लीपमध्ये कोणी झेल सोडला असता तर त्यांनी माझा फोटो छापून किरमाणीने झेल सोडला आहे किंवा स्टंपिंग चुकले आहे असे दाखवले.

पुढे तो म्हणाला मी नेहमीच लढवय्या राहिलो आहे. जेव्हा मला पुनरागमन करायचे होते तेव्हा माझ्याच राज्याने (कर्नाटक) मला संघातून बाहेर फेकले होते. त्यामुळे मला रेल्वेच्या टीममध्ये जावे लागले. तेव्हा कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सचिवाने सांगितले होते की, चांगले आहे तू रेल्वेत जात आहेस. तू कसा कसा खेळा तेही आम्ही पाहतोच. विश्वचषक विजेत्याबद्दल असे बोलले जाते का? असा प्रश्न किरमाणीने विचारला आहे. ऋद्धिमान साहानंतर आता किरमाणी असे बोलल्यामुळे भारतीय क्रिकेट ग्रहण लागले आहे असे म्हणता येईल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

SCROLL FOR NEXT