India vs England 3rd ODI saam tv
Sports

Ind vs Eng: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे वरूण चक्रवर्ती टीममधून बाहेर!

India vs England 3rd ODI: भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी अहमदाबादमध्ये टॉसनंतर सांगितलं की, वरुणच्या पायाला दुखापत आहे. तो सिलेक्शनसाठी उपलब्ध नव्हता.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येतोय. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीचा हा शेवटचा वनडे सामना खेळवण्यात येतोय. त्यामुळे हा सामना महत्त्वाचा मानण्यात येतोय. मात्र अशातच भारताच्या टीमला एक मोठा धक्का बसला आहे. एक खेळाडू दुखापतीमुळे तिसऱ्या वनडेतून बाहेर झाला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताने प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. वरुण चक्रवर्ती सध्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्यात आलंय. भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी अहमदाबादमध्ये टॉसनंतर सांगितलं की, वरुणच्या पायाला दुखापत आहे. तो सिलेक्शनसाठी उपलब्ध नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाने अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे.

या सिरीजनंतर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होणार आहे. मात्र त्यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या रूपात टीम इंडियाला एक धक्का बसला. त्यानंतर आता वरुण चक्रवर्तीच्या पायाला दुखापत झाली आहे. वरुणची समस्या किती गंभीर आहे, याची माहिती अजून मिळालेली नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित म्हणाला की, वरुण वेदनांमुळे त्रस्त आहे आणि तो तिसऱ्या वनडेचा भाग नसणार आहे.

कोणत्या खेळाडूंना मिळाली जागा?

अहमदाबाद वनडेसाठी भारताने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी दिलीये. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली असून तो देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा भाग आहे. यावेळी अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला आज चीममध्ये खेळण्याची संधी आहे. याशिवाय जडेजाला विश्रांती देण्यात आली असून वॉशिंग्टन सुंदरला प्लेईंग ११ मध्ये जागा देण्यात आली आहे.

भारताची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT