virat kohli yandex
Sports

Virat Kohli News: इंग्लंडविरुद्ध न खेळणाऱ्या विराट कोहलीचं टेन्शन वाढलं! ICC च्या क्रमवारीत मोठा उलटफेर

ICC Test Rankings: ही मालिका सुरु होण्यापूर्वीच विराटने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान संघाबाहेर असलेल्या विराटला आयसीसीने मोठा धक्का दिला आहे.

Ankush Dhavre

ICC Test Rankings, Virat Kohli Latest News:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने जोरदार विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने शानदार कमबॅक केलं आहे.

दरम्यान या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये विराट खेळताना दिसून आला नव्हता. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच विराटने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान संघाबाहेर असलेल्या विराटला आयसीसीने मोठा धक्का दिला आहे.

बुधवारी (७ फेब्रुवारी) आयसीसीने कसोटी रँकिंगची घोषणा केली आहे. या यादीत विराट कोहलीची मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत केन विलियम्सन ८६४ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे. तर या रँकिंगमध्ये ६ व्या स्थानी असलेला विराट कोहली ७ व्या स्थानी पोहोचला आहे.

विराट कोहलीचे रेटींग पॉईंट्स ७६० आहेत. ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज उस्मान ख्वाजाने त्याल मागे सोडलं आहे. उस्मान ख्वाजा या यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. कसोटी रँकिंगमध्ये केवळ विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

जसप्रीत अव्वल स्थानी विराजमान...

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.त्याने कसोटी या यादीत आर अश्विनला मागे सोडलं आहे. आर अश्विन अव्वल स्थानावरुन तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर बुमराह ८८१ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज ८५१ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर ८४१ रेटिंग पॉईंट्ससह आर अश्विन तिसऱ्या स्थानी आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा ७४६ रेटिंग पॉईंट्ससह नवव्या स्थानी आहे. (Cricket news in marathi)

विराट केव्हा करणार कमबॅक?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र मालिका सुरु होण्यापू्र्वी त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्याऐवजी रजत पाटीदारला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. आता पुढील ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र अद्यापही विराटच्या कमबॅकबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT