big blow for these 5 teams england players wont be available for ipl 2024 playoffs confirms ecb amd2000 twitter
क्रीडा

IPL 2024 Playoffs: इंग्लंडच्या या एका निर्णयाने IPL च्या ५ संघांचं टेन्शन वाढलं; वाचा कारण

England Cricket Board On IPL Playoffs: टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर होताच, इंग्लंड क्रिकेट बोर्डने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आयपीएलच्या ५ संघांचं टेन्शन वाढलं आहे.

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्याची १ मे ही शेवटची तारीख आहे. एक दिवसाआधीच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंड संघाची धुरा जोस बटलरकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान इंग्लंड संघाची घोषणा होताच आयपीएल फ्रँचायझींचं टेन्शन वाढलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील सामने वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. ही स्पर्धा आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर रंगणार आहे. दरम्यान टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट बोर्डने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आयपीएल स्पर्धेतील काही संघांचं टेन्शन वाढलं आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डने संघाची घोषणा करताच स्पष्ट केलं आहे की, ज्या खेळाडूंचा टी-२० वर्ल्डकपसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्या खेळाडूंना आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफचे सामने खेळता येणार नाहीत. टी-२० वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स संघांचं टेन्शन वाढलं आहे.

या संघांना बसणार फटका...

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना २१ मे पासून प्रारंभ होणार आहे.मात्र या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंना खेळण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. याचा फटका राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसारख्या संघांना बसणार आहे. कारण हे संघ प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर, चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून मोईन अली, कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फिल सॉल्ट आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून विल जॅक्स खेळताना दिसून येणार नाही.

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ:

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले,लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टॉपली, मार्क वुड, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT