Yashasvi Jaiswal: टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी बातमी! T-20 WC आधी यशस्वी जयस्वाल आऊट ऑफ फॉर्म
big blow for team india yashasvi jaiswal out of form ahead of t20 world cup 2024 amd2000 twitter
क्रीडा | T20 WC

Yashasvi Jaiswal: टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी बातमी! T-20 WC आधी यशस्वी जयस्वाल आऊट ऑफ फॉर्म

Ankush Dhavre

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मासह यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर त्याने काही सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी करत कमबॅक केलं. पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यातही तो स्वस्तात माघारी परतला. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने भारतीय संघाला सलामीला जाण्यासाठी पर्याय सुचवला आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना इरफान पठाण म्हणाला की, ' यशस्वी जयस्वालचा फॉर्म हा भारतीय संघाची चिंता वाढवणारा विषय आहे. माझ्या मते, त्याने भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करावी, कारण तो डावखुरा फलंदाज आहे. त्यामुळे विरोधी संघातील गोलंदाज डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने सुरुवात करणार नाही. तो जर फॉर्ममध्ये असेल तर विरोधी संघातील खेळाडू याबाबत नक्कीच विचार करतील. आता त्याचा फॉर्म पाहता भारतीय संघ विचार करेल, रोहित आणि विराटने डावाची सुरुवात करायला हवी का? की यशस्वी आणि रोहितची जोडी परफेक्ट आहे? त्यामुळे यशस्वी जयस्वालचं फॉर्ममध्ये येणं खूप गरजेचं आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' यशस्वी जयस्वालला फॉर्ममध्ये येण्याची संधी आहे. आयपीएलचे आणखी काही सामने शिल्लक आहेत. राजस्थान रॉयल्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. जर राजस्थानने साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकला तर हा संघ टॉप २ मध्ये जाईल. असं झाल्यास या संघाला आणखी सामने खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे यशस्वी जयस्वाल फॉर्ममध्ये येऊ शकतो.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा या स्पर्धेत डावाची सुरुवात करणार हे नक्कीच आहे. मात्र रोहितच्या फॉर्मने देखील भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं आहे. त्याने स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली. मात्र त्यानंतर त्याची बॅट शांतच राहिली. त्यामुळे यशस्वी जयस्वालसह रोहित शर्माचं फॉर्ममध्ये येणंही तितकंच गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alyad palyad 2 : पुन्हा एकदा उडणार प्रेक्षकांच्या भितीचा थरकाप; 'अल्याड पल्याड २'ची घोषणा

Rohit Sharma News : रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठी अपडेट, जय शहा यांनी 'हिटमॅन'च्या चाहत्यांना दिली खुशखबर

Bhagyashree Mote: या ठिकाणी झाला भाग्यश्रीचा जन्म; मुंबईत आहे प्रसिद्ध

Kulcha Recipe : घरच्याघरी तव्यावर बनवा सॉफ्ट कुलचा

Monsoon Special Bhel : पावसाळ्यात घरी बनवा चटकदार गावरान भेळ

SCROLL FOR NEXT