team india saam tv
Sports

WTC Final 2023: टीम इंडियाला मोठा धक्का! बुमराह, अय्यर पाठोपाठ संघातील दिग्गज गोलंदाज WTC फायनलमधून बाहेर?

Umesh Yadav: भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

Team India WTC Final: सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक सामने सुरु आहेत. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळाडू जोर लावताना दिसून येत आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

हा सामना ७ ते ११ जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर होऊ शकतो.

उमेश यादव हा आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाविरुध्द झालेल्या सामन्यात तो खेळताना दिसून आला नव्हता.

आता उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळणार की नाही याबाबत कुठलीही अपडेट समोर आली आहे. जर येणाऱ्या सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फिट झाला तर, तो पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)

जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर नंतर आता उमेश यादव होणार बाहेर?

उमेश यादवच्या दुखापतीने भारतीय संघाची चिंता वाढवली आहे. कारण भारतीय संघातील दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त आहे. संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर झाले आहेत. या खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची घोषणा लवकरच केली जाऊ शकते.

हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोरदार प्रयत्न करताना दिसून येणार आहे. कारण भारतीय संघाला दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्याची सनदी मिळाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

भारतीय संघ (Team India WTC Final squad) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT