
Team India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा बिगुल वाजला आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचा स्क्वाड घोषित करण्यात आला आहे. दोन्ही संघ जेतेपद मिळवण्यासाठी इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर आमने सामने येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत मालिका जिंकली होती. या मालिकेत भारतीय संघाचं पारडं जड होतं. मात्र अंतिम सामन्यात जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ विजयाचा प्रबळ दावेदार असणार आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया संघात असा एक खेळाडू आहे, जो भारतीय संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.
आम्ही कोणाबद्दल बोलतोय याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. आम्ही बोलतोय, ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनबद्दल. या फिरकी गोलंदाजांनी अनेकदा भारतीय संघाच्या अडचणीत वाढ केली आहे.
बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत या गोलंदाजाने २२ विकेट्स घेतल्या होत्या. इतकचं नाही तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीत १०० विकेट्स घेणारा लायन हा पहिलाच गोलंदाज आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीत त्याने आतापर्यंत ११६ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)
भारतीय संघाविरुद्व खेळताना जोरदार कामगिरी
नॅथन लायन हा भारतीय संघाविरुद्ध जोरदार कामगिरी करतोय. त्याने बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत २ वेळा सामन्यात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तर ९ वेळेस त्याने ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर, नॅथन लायन विरुद्ध खेळताना जपून फलंदाजी करावी लागणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ (WTC Squads)
भारतीय संघ (Team India WTC Final squad) :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया (Australia WTC Final Squad) :
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (व्हीसी) , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.