Virat Kohli Fined: WTC साठी टीम इंडियाची घोषणा होताच Virat वर मोठी कारवाई, कारणही आलं समोर

Virat Kohli Fined In IPL: विराट कोहलीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
VIRAT KOHLI
VIRAT KOHLISaam TV

RCB VS RR IPL 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सध्या आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी करतोय. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये या संघाने विजय मिळवला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये फाफ डू प्लेसिस ऐवजी विराट कोहली संघाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात आला होता.

स्पर्धेतील ३२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ७ धावांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर विराट कोहलीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

VIRAT KOHLI
Virat - Rohit Exit In IPL?: क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! विराट अन् रोहीत IPL मधुन घेणार एक्सिट,मोठं कारण आलं समोर

या सामन्यात कार्यवाहक कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने जोरदार विजय मिळवला.

मात्र सामन्यानंतर विराट कोहलीसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात षटकाचा वेग कमी ठेवल्याने विराट कोहलीवर दंड ठोठवण्यात आला आहे.

VIRAT KOHLI
Virat Kohli Instagram Post: माहीवरचे प्रेम! विराटने शेअर केली खास पोस्ट

षटकांचा वेग कमी ठेवल्यास कर्णधारावर दंड ठोठावला जातो. मात्र यावेळी संपूर्ण संघावर दंड ठोठावण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहलीवर २४ लाख तर संघातील खेळाडूंची मॅच फीसची २५ टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे. आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले की, विराट दुसऱ्यांदा ठरलेल्या वेळेत षटक पूर्ण करू शकला नाहीये. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. (Latest sports updates)

विराट कोहलीवर २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच इम्पॅक्ट प्लेयरसह प्लेइंग-११ मध्ये असलेल्या इतर खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपये किंवा सामन्याच्या २५टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी फाफ डू प्लेसिस संघाचा कर्णधार असताना, लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील ही कारवाई करण्यात आली होती.

VIRAT KOHLI
Virat-Anushka Dance Video: विराट-अनुष्काचा डान्स VIDEO व्हायरल, मात्र शेवट पाहून कोहलीच्या फॅन्सची चिंता वाढली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली होती.

तर फाफ डू प्लेसिसने ६२ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ९ गडी बाद १८९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना देवदत्त पडीक्कलने ५२ धावांची खेळी केली.

तर यशस्वी जैस्वालने ४७ धावांचे योगदान दिले. राजस्थान रॉयल्स संघाला या सामन्यात १८२ धावा करता आल्या. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलूरू संघाने ७ धावांनी विजय मिळवला .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com