Rohit Sharma: आयपीएल स्पर्धेत आज इतिहास घडणार आहे. कारण आज या स्पर्धेतील १००० वा रंगणार आहे. हा सामना वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. यावर आता मुंबईचे हेड कोच मार्क बाऊचरने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या फलंदाज आणि कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. मुंबई इंडियन्स संघाने या हंगामातील ७ सामन्यांमध्ये केवळ ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
तर फलंदाजी करताना रोहित शर्माला केवळ १ अर्ध शतक झळकावता आले आहे. त्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नाहीये. त्याची ही कामगिरी पाहता, माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. (Latest sports updates)
याबाबत बोलताना मुंबईचा कोच मार्क बाऊचर म्हणाले की, 'रोहितने विश्रांती घ्यावं असं मला मुळीच वाटत नाही. हा माझा कॉल नाही. साहजिकच, रोहितने खेळलेलं आम्हाला आवडेल. तो एक चांगला खेळाडू आहे. तसेच एक चांगला कर्णधार देखील आहे.'
तसेच तो पुढे म्हणाले की, 'जर रोहितला खरचं विश्रांती हवी असेल तर तो मला येऊन बोलेल, मला विश्रांतीची गरज आहे. यावर आम्ही नक्कीच विचार करू. त्याने असं काहीच म्हटलेलं नाहीये. जर तो खेळण्यासाठी उपल्बध आहे. तर तो नक्कीच खेळणार.'
काय म्हणाले होते सुनील गावसकर?
गेल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी रोहित शर्माला मोलाचा सल्ला दिला होता. त्यांनी म्हटले होते की, 'खरं सांगायच झालं तर रोहित शर्माने आता काही काळासाठी विश्रांती घेऊन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी स्वतःला फिट ठेवणे गरजेचे आहे. आयपीएलच्या अखेरच्या काही सामन्यांसाठी परत आला तरी हरकत नाही, परंतु आत्ता विश्रांती घेणे आवश्यक आहे.' वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.