team india saamtv
Sports

IND vs BAN मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुखापतग्रस्त

Suryakumar Yadav Injury: येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Ruled Out Of First Round Of Duleep Trophy: भारतीय संघ काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. भारताचं पुढील लक्ष बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेवर असणार आहे.

येत्या १९ सप्टेंबरपासून दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. दरम्यान या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर

भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव दुलीप ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरणार होता. मात्र दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला स्पर्धेतील पहिल्या फेरीतून बाहेर पडावं लागलं आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी बुची बाबू स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेदरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. सूर्याकडे भारतीय कसोटी संघात कमबॅक करण्याची ही सुवर्णसंधी होती. मात्र आता त्याला संघात कमबॅक करण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते. सूर्यकुमार यादव हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे.

केव्हा होणार सुरुवात?

दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला येत्या ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारातीय संघातील प्रमुख खेळाडू देखील खेळताना दिसून येणार आहे. जे खेळाडू संघाबाहेर आहेत, त्यांना चांगली कामगिरी करुन भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी आहे. बीसीसीआय लवकरच भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल फलंदाज

टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव अव्वल फलंदाज आहे. इंग्लंडविरुद्ध आपल्या टी-२० कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सूर्यकुमार यादवने अवघ्या काही वर्षातच टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

मात्र वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आपलं स्थान टीकवून ठेवता आलेलं नाही. काही महिन्यांपूर्वी त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र चांगली कामगिरी करता न आल्याने त्याला संघाबाहेर पडावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT