hardik pandya twitter
Sports

Hardik Pandya, IND vs SL: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! हार्दिक पंड्याची वनडे मालिकेतून माघार; मोठं कारण आलं समोर

Hardik Pandya Ruled Out, IND vs SL: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेतली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना झाला होता. या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी दिली गेली होती. लवकरच भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होण्यापूर्वी हार्दिक पंड्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

हार्दिक पंड्याबाबत मोठी अपडेट

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या मालिकेचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ २२ जुलै रोजी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. दरम्यान या दौऱ्यावर होणाऱ्या वनडे मालिकेसाठी हार्दिक पंड्या उपलब्ध नसणार आहे. त्याने बीसीसीआयकडे वैयक्तिक कारणास्तव मालिकेतून माघार घेत असल्याची विनंती केली, असं वृत्त एक्स्प्रेस स्पोर्ट्सने दिलं आहे.

रोहित शर्माने टी-२० क्रिकेटला रामराम केल्यानंतर हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. त्याने वनडे मालिकेतून माघार घेतली असली, तरीदेखील २७ जुलैपासून सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेत तो खेळताना दिसून येऊ शकतो. त्यानंतर २ ऑगस्टपासून वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतून विराट कोहली आणि रोहित शर्मालाही विश्रांती देणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाची धुरा कोणाच्या हाती सोपवली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

असं आहे वेळापत्रक

टी-२० मालिका

पहिला टी -२० सामना- २७ जुलै

दुसरा टी -२० सामना- २८ जुलै

तिसरा टी -२० सामना- ३० जुलै

वनडे मालिका

पहिवा वनडे सामना- २ ऑगस्ट

दुसरा वनडे सामना- ४ ऑगस्ट

तिसरा वनडे सामना - ७ ऑगस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT