IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी या दिवशी होऊ शकते टीम इंडियाची घोषणा! पाहा संभावित संघ

India Tour Of Sri Lanka: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.
IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी या दिवशी होऊ शकते टीम इंडियाची घोषणा! पाहा संभावित संघ
india vs srilanka yandex
Published On

भारतीय संघ जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतून गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून पदार्पण करणार आहे. भारतीय संघ २७ जुलै रोजी आपला टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? जाणून घ्या.

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी या दिवशी होऊ शकते टीम इंडियाची घोषणा! पाहा संभावित संघ
IND vs ZIM: झिम्बाब्वे संघाचा दारुण पराभव; टीम इंडियाने ४-१ ने जिंकली मालिका

केव्हा होणार भारतीय संघाची घोषणा?

माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मुख्य निवडकर्ते अजीत आगरकरांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर भारतीय संघाची घोषणा केली जाईल. माध्यमातील वृत्तानुसार याच आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाईल.

झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. तर शुभमन गिलकडे संघाची जबाबदारी देण्यात आली होती. या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने बाजी मारली. माध्यमातील वृत्तानुसार, श्रीलंका दौऱ्यावर जाणारा संघ हा झिम्बाब्वे दौऱ्यापेक्षा वेगळा असू शकतो. या दौऱ्यावर हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून निवड केली जाऊ शकते. यासह सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, रिषभ पंत या खेळाडूंचाही समावेश केला जाऊ शकतो.

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी या दिवशी होऊ शकते टीम इंडियाची घोषणा! पाहा संभावित संघ
IND vs ZIM : यशस्वी जयस्वालच्या वादळी खेळीची कमाल, एका बॉलमध्ये भारतानं मोडला पाकिस्तानचं रेकॉर्ड , Video

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ:

- शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद/मुकेश कुमार.

तर वनडे मालिकेसाठी केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग यांना संधी दिली जाऊ शकते. यासह रिषभ पंत आणि केएल राहुलचा देखील संघात समावेश केला जाऊ शकतो. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांना संधी दिली जाऊ शकते.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ:

- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

रोहित,विराट आणि बुमराहला विश्रांती दिल्यास असा असू शकतो संघ-

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, खलील अहमद, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com