team india google
Sports

IND vs SA: पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक हादरा! संघातील हुकमी एक्का दुसऱ्या सामन्यातून बाहेर?

India vs South Africa 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना येत्या ३ ते ७ जानेवारीदरम्यान खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे

Ankush Dhavre

Shardul Thakur Injury:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना येत्या ३ ते ७ जानेवारीदरम्यान खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शार्दुल ठाकुरला नेट्समध्ये सराव करत असताना दुखापत झाली आहे.

या कारणामुळे तो केपटाऊनमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून येणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुखापतामुळे तो नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करु शकलेला नाही.

शार्दुल ठाकुर दुखापतग्रस्त..

तर झाले असे की, शार्दुल ठाकुरने पॅड्स घालून थ्रो डाऊन नेट्समध्ये फलंदाजीच्या सरावासाठी पहिला नंबर लावला. तो फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासोबत फलंदाजीचा सराव करत होता.

त्यावेळी चेंडू त्याच्या उजव्या खांद्याला जाऊन लागला. नेट्स सेशन सुरु होऊन अवघे १५ मिनीटं झाले होते तेव्हा ही घटना घडली. विक्रम राठोड यांनी टाकलेल्या शॉर्ट बॉलचा त्याला अचुक अंदाज घेता आला नाही. त्यामुळे चेंडू खांद्याला जाऊन लागला. चेंडू लागला, वेदना झाल्या तरीही त्याने फलंदाजी करणं सुरुच ठेवलं. (Latest sports updates)

मात्र त्यानंतर तो फलंदाजीचा सराव करण्यासाठी मैदानावर आला नाही. फिजियोने त्याला खांद्याला बर्फ लावला. त्यानंतर तो सराव करताना दिसून आला नाही. ही दुखापत गंभीर नसली तरी शार्दुल ठाकुरला दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठ्या स्पेल्स टाकायच्या आहेत. त्यासाठी तो पूर्णपणे फिट असणं गरजेचं आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं होतं. मात्र तो आपली छाप सोडू शकला नव्हता. गोलंदाजी करताना त्याने १९ षटकात १०० पेक्षाही अधिक धावा खर्च केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT