team india saam tv
Sports

Team India: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू महत्वाच्या सामन्यातून बाहेर पडणार?

Shubman Gill: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलं आहे. आता भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आजारी पडला आहे. त्यामुळे त्याने सराव सत्रातही सहभाग घेतला नव्हता. गिल दुखापतग्रस्त होण्यापूर्वी रिषभ पंत देखील आजारी पडला होता. न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

कारण हा सामना जिंकून भारतीय संघाकडे अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी असणार आहे. दरम्यान बुधवारी भारतीय खेळाडू मैदानात सराव करताना दिसून आले. मात्र गिल सरावासाठी उपलब्ध नव्हता. माध्यमातील वृत्तानुसार, शुभमन गिल आजारी आहे. त्यामुळे त्याला सरावासाठी मैदानात येता आलं नाही.

गिलला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार का?

गिल आजारी असणं ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे. मात्र समाधानकारक बाब अशी की, या सामन्याला अजूनही ३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गिल पूर्णपणे फिट होऊन खेळण्यासाठी मैदानात उतरु शकतो. गिल संघात असणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण पहिल्याच सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती.

भारत- न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. या दोन्ही संघांनी ३ पैकी २ सामने जिंकून सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. आता शेवटचा सामना ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानी जाण्यासाठी असणार आहे. कोणता संघ अव्वल स्थानी जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Attraction to toxic men: मुली टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? 'ही' 6 मानसिक कारणं समजून घ्या

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT