Team india squad : File photo saam tv
Sports

Jasprit Bumrah : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाला मोठा झटका; संघातील प्रमुख प्लेअर होणार आऊट?

Jasprit Bumrah Champions Trophy Latest Update : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जवळ आली आहे. पण त्याआधीच भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याआधी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतून बाहेर गेला आहे.

Nandkumar Joshi

Jasprit Bumrah injury update : तेजतर्रार आणि यॉर्कर माऱ्यानं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरोधात होणाऱ्या वनडे मालिकेत खेळणार नाही. रिपोर्टनुसार, बुमराह इंग्लंडविरुद्ध ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार नाही. या मालिकेतील तिसऱ्या मुख्य लढतीसाठी बुमराहची वनडे संघात निवड झाली होती.

भारतीय क्रिकेट संघाला आणि कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्कादायक वार्ता आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कणा समजला जाणारा जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही. खरं तर इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांत जसप्रीत बुमराहचं खेळणं कठीण होतं. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता.

या दुखापतीतून तो अखेरच्या वनडे सामन्यापर्यंत सावरेल अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त केली जात होती. पण आता तो इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. या मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. पण त्याआधी जर जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला नाही तर हा मोठा धक्का असेल, असे मानले जात आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणेही कठीण

दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची शक्यताही कमी असल्याचे बोलले जाते. रिपोर्टनुसार, बुमराह सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असून, तिथे त्याची फिटनेस चाचणी होईल. सध्या तो मेडिकल टीमच्या देखरेखीखाली असणार आहे. यासंबंधी एका इंग्रजी दैनिकानंही वृत्त दिलं होतं. अकादमीत तो मेडिकल टीमच्या देखरेखीखाली राहणार असून, पूर्ण चाचणीनंतर त्याचा अहवाल निवड समितीकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती मिळते.

भारतीय संघाकडे फक्त एक आठवडा

जसप्रीत बुमराहचा समावेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघाच्या चमूमध्ये करावा की नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी निवड समितीकडं फक्त एका आठवड्याचा कालावधी आहे. आयसीसीनं दिलेल्या मुदतीनुसार १२ फेब्रुवारीपर्यंत सर्व संघांना आपल्या चमूमध्ये बदल करता येणार आहे. त्यामुळे बुमराहच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आता भारतीय संघाकडं अवघा एक आठवडा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT