south africa cricket team google
क्रीडा

IND vs SA, Test Series: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का ! दुसऱ्या सामन्यातून मॅचविनर खेळाडू बाहेर

Ankush Dhavre

Temba Bavuma Ruled Out From IND vs SA 2nd Test:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या विजयानंतरही दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावूमा हा हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवतोय. याच कारणामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून आला नव्हता. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतही बावूमाला हॅमस्ट्रिंगच्या त्रासामुळे संघाबाहेर राहावं लागलं होतं.

तसेच भारतीय संघाविरुद्ध पार पडलेल्या सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्याच दिवशी तो क्षेत्ररक्षण करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर आलाच नाही. बावूमा नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. यापूर्वी अनेकदा त्याला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं आहे. (Latest sports update)

बावूमाच्या जागी कोण खेळणार?

टेम्बा बावूमा हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे.त्यामुळे बावूमानंतर ही जबाबदारी डीन एल्गर पार पाडताना दिसून येऊ शकतो.दुसऱ्या कसोटीतून बाहेर होताच बावूमाच्या जागी २८ वर्षीय जुबुर हमजाला संघात स्थान देण्यात आलं आहे.

त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने कसोटी कारकिर्दीतील ६ सामन्यांमध्ये २१२ धावा केल्या आहेत. यासह त्याला एक वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ८९ सामन्यांमध्ये ६२७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १७ शतक आणि ३० अर्धशतकं झळकावली आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमधील ६८ सामन्यांमध्ये त्याने २०१७ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT