south africa twitter
क्रीडा

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Ankush Dhavre

Temba Bavuma Ruled Out: दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत २- ० ने आघाडी घेतली आहे. तर तिसरा वनडे सामना सोमवारी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. थेट संघाचा कर्णधार टेम्बा बावूमा दुखापतग्रस्त झाला आहे.

कर्णधार संघाबाहेर

आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा सामना अबू धाबीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात टेम्बा बावुमा खेळताना दिसून येणार नाही. तो दुखापतग्रस्त झाला आहे. यापूर्वी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात धावबाद होऊ नये म्हणून त्याने डाईव्ह मारली होती. या प्रयत्नात तो दुखापतग्रस्त झाला. या घटनेनंतर तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला नव्हता.

हा खेळाडू होणार कर्णधार

तिसऱ्या वनडेसाठी टेम्बा बावूमाच्या जागी रिजा हेंड्रिक्सला संघात स्थान देण्यात आलं आहे. तो सोमवारी होणाऱ्या सामन्यासाठी जोडला जाणार आहे. तर टेम्बा बावूमाच्या जागी नव्या कर्णधाराची घोषणा देखील करण्यात आली आहे. बावुमाच्या जागी रासी वेन डर डुसेन संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. रिजा हेंड्रिक्सचा रेकॉर्ड पाहिला, तर त्याने आतापर्यंत ३७ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ९७३ धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेकडे २-० ची आघाडी

या ३ सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी करत २-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १३९ धावांनी बाजी मारली होती. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडवर १७४ धावांनी विजय मिळवला. आता मालिकेतील तिसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ आयर्लंडचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

SCROLL FOR NEXT