Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Bachchu Kadu : शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंना पाठींबा देणाऱ्या बच्चू कडूंना शिंदेंनी धक्का दिलाय.. बच्चू कडूंचा एकमेव आमदार शिंदेंनी गळाला लावल्याने बच्चू कडूंचं टेंशन वाढलंय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला
CM Eknath Shinde and Bacchu KaduSaam Tv
Published On

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतून बाहेर पडत तिसऱ्या आघाडीची स्थापना करत बच्चू कडूंनी महायुतीची कोंडी केलीय. तर दुसरीकडे अडचणीच्या काळात मंत्रिपद सोडून साथ देणाऱ्या बच्चू कडूंनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जबरदस्त धक्का दिलाय.

शिंदेंनी बच्चू कडूंचे मेळघाटातील एकमेव आमदार राजकुमार पटेलांना गळाला लावलंय. त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा दिलाय. तर पुन्हा फोडाफोडीवरून विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. याचबद्दल बोलताना प्रहार जनशक्ती अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले आहेत की, आमदार फोडण्याच्या प्रयत्नाला व्यवस्थित उत्तर देऊ. तर याचबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिथं खोके तिथं धोके आहे हे समजून घ्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला
Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

महायुती सरकारमध्ये बच्चू कडूंना मंत्रिपदापासून वंचित रहावं लागलं. त्याबाबत बच्चू कडूंनी वारंवार आपली नाराजी बोलून दाखवली होती. तर विधानसभेपुर्वी राजकुमार पटेलांना गळाला लावून थेट मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंवर प्रहार केलाय. मात्र बच्चू कडूंची राजकीय कारकीर्द कशी आहे, हे जाणून घेऊ...

बच्चू कडूंची राजकीय कारकीर्द?

1999 मध्ये बच्चू कडूंकडून प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना

1999 विधानसभेत कडूंचा निसटता पराभव

2004 पासून कडू सलग 4 वेळा अपक्ष आमदार

2019 मध्ये राजकुमार पटेलांसह प्रहारच्या आमदारांची संख्या 2 वर

2019 उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यमंत्री म्हणून काम

2022 शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीत सहभाग

2024 लोकसभेला प्रहारचा उमेदवार असतानाही मेळघाटातून राणांना 21 हजार मतांची आघाडी

2024 संभाजीराजे, राजू शेट्टींसह परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची स्थापना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला
Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेचं नेमकं गणित

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करतानाच आमदाराने साथ सोडण्याची तयारी केल्याने बच्चू कडूंची वाट खडतर बनलीय. त्यामुळे बच्चू कडू आता शिंदेंना कसं उत्तर देणार? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com