Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

Tirupati Balaji Prasad News : तिरुपती बालाजी देवस्थान पुन्हा एकदा वादात अडकलं आहे. बालाजीच्या प्रसादात आता किडे आढळल्याचा दावा भक्तांनी केला आहे.
Tirupati Balaji Prasad
Tirupati Balaji PrasadSaam Digital
Published On

तिरुपती बालाजी देवस्थान पुन्हा एकदा वादात अडकलंय...बालाजीच्या प्रसादात आता किडे आढळल्याचा दावा भक्तांनी केलाय...आधीच लाडूत प्राण्याची चरबी असल्याच्या दाव्याने खळबळ उडाली होती...आता नवीन दावा केल्यानं वादाची शक्यताय...काय आहे हा सगळा प्रकार पाहुयात...

तिरुपती मंदिरातील प्रसादाचा वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत...प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असलेलं तूप वापरल्याबाबतचा वाद अद्याप संपलेला नसताना एका भक्ताने प्रसादात किडे सापडल्याचा दावा केलाय...दुपारच्या जेवणाच्या प्रसादात किडे आढळून आल्याचे भक्ताने आरोप केलेय...भक्ताने दावा केलेला हाच तो प्रसाद आहेत...यात काळा दिसणारा किडा असल्याचा आरोप भक्तांनी केलाय...

बुधवारी प्रसाद घेण्यासाठी आम्ही गेलो त्यावेळी त्यांना प्रसादात किडे आढळले. दही भातामध्ये किडे होते, असा आरोप एक भाविकाने केला आहे.मात्र, भक्ताने लावलेला आरोप मंदिर प्रशासनाने फेटाळून लावलाय...अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिलंय...

Tirupati Balaji Prasad
Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

तिरूपती बालाजी देवस्थानचं स्पष्टीकरण

प्रसादात किडे सापडल्याचा आरोप निराधार आणि खोटे

मंदिरात दररोज हजारो लोकांसाठी ताजा प्रसाद तयार केला जातो

श्रीवारी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी गरम अन्नाचा प्रसाद तयार करते

भक्तांना भगवान व्यंकटेश्वरावरील त्यांच्या श्रद्धेपासून दूर करण्याचा प्रयत्न

संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रकार

हा तिरुपती देवस्थानला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचं म्हणत समितीने दावा फेटाळून लावलाय...मात्र, काही दिवसांपूर्वी लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याचं प्रकरण समोर आल्याने देवस्थानचा वाद थांबताना दिसत नाहीये.

Tirupati Balaji Prasad
Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com