Royal Challengers Bengaluru Vs Chennai Super Kings Match May Cancelled Due To Rain Saam TV
Sports

RCB vs CSK, IPL 2024: बंगळुरुच्या फॅन्ससाठी चिंता वाढवणारी बातमी! RCB vs CSK सामना रद्द होण्याची शक्यता; वाचा कारण

RCB vs CSK, Weather Update: आयपीएल २०२४ स्पर्धा सध्या रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेत १८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना करताना दिसून येणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा सध्या रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेत १८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकणारा एक संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर सामना जिंकणारा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणारा हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. सामन्यावेळी बंगळुरुत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे हा सामनाही धुतला जाऊ शकतो. असं झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्लेऑफमध्ये जाण्याचं स्वप्न भंग होऊ शकतं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने १३ सामने खेळले असून ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. १२ गुणांसह हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. या संघाचा नेट रनरेट +०.३८७ इतका आहे. १२ गुण असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर १४ गुणांपर्यंत पोहचावं लागेल.

कोण जाणार प्लेऑफमध्ये? (Playoff)

येत्या शनिवारी पाऊस पडणार असा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आहे. हा अंदाज जर खरा निघाला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा अंदाज चुकेल. हा सामना जर रद्द केला गेला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. असं झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १३ गुणांपर्यंत पोहचेल. हे गुण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पुरेशे नसतील. तर चेन्नईचा संघ १५ गुणांपर्यंत पोहचेल. असं झाल्यास या संघाला इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात स्कूलबस गेली वाहून

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

SCROLL FOR NEXT