new zealand twitter
Sports

Champions Trophy 2025: न्यूझीलंडला आणखी एक मोठा धक्का! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

Lockie Ferguson Ruled Out: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिला सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक असताना, न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र दुखापतीचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत यजमान पाकिस्तानचा संघ बलाढ्य न्यूझीलंडचा सामना करताना दिसून येणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सराव सामन्यादरम्यान,लॉकी फर्ग्युसनच्या डाव्या पायाला दुखापत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्याची मेडिकल चाचणी घेण्यात आली. तो ही स्पर्धा खेळण्यासाठी फिट नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने त्याला रिहॅबला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गोलंदाजाला मिळाली संधी

लॉकी फर्ग्युसन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाहीये. त्याच्या जागी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनला संघात स्थान देण्यात आलं आहे. आज संध्याकाळी तो पाकिस्तानला जाण्यासाठी रवाना होणार आहे.

न्यूझीलंडचा पहिला सामना १९ फेब्रुवारीला यजमान पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. मात्र या सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल. जेमिसनला देखील न्यूझीलंड संघात कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. तो देखील दुखापतीमुळे गेल्या १० महिन्यांपासून संघाबाहेर होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा आहे न्यूझीलंडचा संघ:

मिचेल सँटनर (कर्णधार), केन विलियम्सन, माइकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवोन कॉनव्हे, मॅट हेनरी, टॉम लेथम, डॅरिल मिचेल, विल ओराउरकी, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, नॅथन स्मिथ, विल यंग, जेकब डफी आणि काइल जैमीसन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

SCROLL FOR NEXT