Neeraj Chopra to miss Ostrava Golden Spike 2024 saam tv
Sports

Neeraj Chopra Injury: भारताला मोठा धक्का! पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी गोल्डन बॉय नीरज चोप्रा दुखापतग्रस्त

Neeraj Chopra News In Marathi: भारताला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नीरज चोप्राने मोठ्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

भारतीय खेळाडूंचं संपूर्ण लक्ष आता पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेवर असणार आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा असणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ऑलिम्पिक स्पर्धेला २ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना नीरज चोप्रा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळेच त्याने ६३ व्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक २०२४ ॲथलेटिक्स मीटमध्ये सहभाग घेतला नाहीये.

नीरज चोप्रा हा ६३ व्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक २०२४ ॲथलेटिक्स मीटमध्ये सहभाग घेणार नाहीये, ही माहिती आयोजकांनी दिली आहे. तो दुखापतीमुळे या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीये. मात्र तो पाहुणा म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

काह दिवसांपूर्वीच ओडिशा येथे फेडरेशन कप स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धेत नीरज चोप्राने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत नीरज चोप्राने ८२.२७ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. दरम्यान तो या स्पर्धेत दुखापतग्रस्त झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला ऐतिहासीक पदक मिळवून दिलं होतं. त्यामुळे त्याच्याकडून विजयाच्या आशा वाढल्या आहेत. नीरज चोप्रा स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्याऐवजी युरोपियन चॅम्पियन ज्युलियन वेबरचा या स्पर्धेत समावेश केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT